मुंबई : मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मुंबईत आज पासून नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार आजपासून मुंबईतील मैदाने आणि प्राणिसंग्रहालयले बंद राहणार आहेत.
मुंबईतील प्रसिद्ध राणीची बाग देखील अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यासाठी निर्णय घेण्यात आला आहे. पालिकेने आज राणी बाग प्राणिसंग्रहालय बंद करण्यासाठी नोटीस काढली आहे. मुंबईतील नागरिक मोठ्या संख्येने राणी बाग प्राणिसंग्रहालयाला भेट देत असतात. ज्यात मोठ्या प्रमाणात लहान मुलांचा सहभाग असतो. त्यामुळे या राणीबाग तसेच उद्याने नागरिकांसाठी खुली ठेवणे जोखमीचे ठरू शकते. याने कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ शकते. त्यामुळेच महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतला.
The number of corona patients in Mumbai is increasing day by day. Therefore, new restrictions have been imposed in Mumbai from today. Accordingly, grounds and zoos in Mumbai will remain closed from today.