पायल घोषने बिनशर्त मागितली माफी, रिचा चड्ढा ने मानहानीचा खटला घेतला मागे

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढा आणि पायल घोष यांनी मुंबई उच्च न्यायालयात सांगितले की त्यांनी परस्पर वाद मिटविला आहे आणि संमत केलेल्या अटी दाखल केल्या आहेत, ज्या अंतर्गत घोष ने रिचा चड्ढा विरोधात केलेले विधान मागे घेतले आणि माफी मागितली. विशेष म्हणजे, रिचा चड्ढा ने गेल्या आठवड्यात  पायल घोष विरोधात ‘खोटी, निराधार, अशोभनीय आणि बदनामीकारक विधानं’ तसेच नुकसान भरपाई मागितल्याबद्दल मानहानीचा खटला दाखल केला होता.

पायल घोष ने चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपविरूद्ध लैंगिक शोषणाचा आरोप केला होता आणि या प्रकरणात रिचा चड्ढासह दोन महिलांची नावेही दिली होती. पायल घोष चे वकील नितीन सातपुते यांनी न्यायमूर्ती ए.के. मेनन यांना सांगितले की दोन्ही बाजूंनी परस्पर संमतीने हा वाद मिटविला आहे आणि या संदर्भात अर्ज दाखल केला आहे.

अभिनेत्री पायल घोष ने वचनपत्रात म्हटले आहे की, तिने रिचा चड्ढाविरोधात दिलेलं विधान मागे घेत आहे आणि माफी मागतेय. सातपुते यांनी उच्च न्यायालयात सांगितले की या प्रकरणात दोन्ही बाजूंनी एकमेकांवर गुन्हा नोंदविला जाणार नाही आणि नुकसानभरपाई म्हणून पैसे मागितले जाणार नाहीत यावर सहमती दर्शविली आहे.

त्याचवेळी रिचा चड्ढा यांचे वकील वीरेंद्र तुळजापुरकर आणि सविना बेदी यांनीही प्रकरण मिटवल्याचे सांगितले. न्यायमूर्ती मेनन यांनी हे मान्य केले आणि घोषवरील खटला फेटाळून लावला.

पायलने तिच्या एका मुलाखतीत रिचाचे नाव घेतले होते, अनुराग कश्यपने तिला सांगितले होते की, रिचासह इतर अनेक अभिनेत्री त्याच्याशी कन्फर्टेबल आहेत.

घरगुती उपाय करून तजेलदार त्वचेसाठी वापरा या ब्युटी टिप्स…

Social Media