मुंबई : देशभरामध्ये कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत, अशा परिस्थितीत लोकांसमोर अनेक आवश्यक वस्तूंची कमतरता भासत आहे. रूग्णांना औषधे आणि रूग्णालयांमध्ये बेड देखील मिळत नाहीत. तर अनेक लोक रूग्णांची मदत करीत आहेत. यामध्ये बॉलिवूड स्टार सोनू सूद याचा देखील समावेश आहे. सोनू सूद (Sonu Sood)लोकांना रेमडेसिविर इंजेक्शन देखील मिळवून देण्यास मदत करत आहे. हेच कारण आहे की, लोक त्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीने त्याचे आभार मानत आहेत.
अलिकडेच एक व्हिडीओ समोर आला होता. यामध्ये अनेक लोक सोनू सूदच्या फोटोवर दूधाचा अभिषेक करत होते. टीव्ही अभिनेत्री कविता कौशिकने (Kavita Kaushik)याचा विरोध करत ट्विटरवर लिहिले आहे की, ‘आपण सर्व सोनू सूदवर प्रेम करतो. देश त्यांच्या प्रामाणिक कार्यासाठी नेहमीच आभारी राहील, परंतु मला पूर्ण खात्री आहे की या मुर्खपणाचा आणि निराशाजनक कामाचा सोनू सूदला देखील आनंद होणार नाही. अशा परिस्थितीत जेथे लोक उपाशी मरत आहेत तेथे दूध वाया घालविले जात आहे. तसेच, आपण नेहमी गोष्टींचा अतिरेक का करतो? ’
We love @SonuSood and the nation will be indebted to him forever for his selfless acts, but I’m sure even Sonu will be unhappy with this foolish and uninspiring act of wasting milk in times where people are dying of hunger.. why are we so extra always with everything ??!! pic.twitter.com/liGuYuIYHt
— Kavita Kaushik (@Iamkavitak) May 20, 2021
सोनू सूदवर लोकांचे हे प्रेम पहिल्यांदाच दिसून आलेले नाही. गेल्या वर्षी लोकांनी सोनू सूदचे मंदीर देखील उभारण्याची इच्छा व्यक्त केली होती. तथापि अभिनेता सोनू सूदने या गोष्टीवर कधीच सहमती दर्शविली नाही. काही दिवसांपूर्वीच लोक सोनू सूदकडे मदत मागण्यासाठी त्याच्या मुंबईतील घरी पोहोचले होते. त्यांनी लोकांचे आवाहन ऐकले होते आणि पूर्ण मदतीचे आश्वासन देखील दिले होते.
Kavita Kaushik was angry when people offered milk on Sonu Sood’s picture
अजय देवगणचा अगामी चित्रपट ‘मैदान’ च्या सेटला देखील मोठ्या प्रमाणात नुकसान –