बीटा स्ट्रेनच्या तुलनेत डेल्टा व्हेरिएंटविरूद्ध अधिक प्रभावी आहे फायझर आणि जे एँड जे कंपनीची लस : दक्षिण आफ्रिकी तज्ज्ञ

जोहानसबर्ग : दक्षिण आफ्रिकेत वापरल्या जाणाऱ्या अमेरिकन फार्मा कंपनीची फायझर आणि जॉन्सन एँड जॉन्सन कंपनीची कोरोना वॅक्सीन कोरोनाच्या बीटा स्ट्रेन च्या तुलनेत डेल्टा व्हेरिएंटविरूद्ध अधिक प्रभावी आहे. आफ्रिकेतील तज्ञांनी याबाबत म्हटले आहे. बीटा व्हेरिएंट प्रथम आफ्रिकेत आढळून आला होता. या वर्षीच्या सुरूवातीला हा विषाणू दुसऱ्य़ा लाटेचे कारण ठरला होता. तर, डेल्टा व्हेरिएंट प्रथमच भारतात आढळून आला होता.

यामुळे दक्षिण आफ्रिकेत सध्या तिसरी लाट आहे. दरम्यान संसर्ग आणि मृत्यूचे प्रमाण मागील दोन लाटेच्या तुलनेत अधिक दिसून आले. परिणामी लॉकडाऊन निर्बंधात वाढ झाली असून शुक्रवारी कार्यवाहक आरोग्यमंत्री ममामोलोको कुबायी यांच्या नेतृत्वात एका पत्रकार परिषदेत, तज्ञांनी सांगितले की, लॅब रिसर्च आणि फिल्ड स्टडी दोन्हींच्या परिणामांद्वारे असे दिसून आले की लस डेल्टा व्हेरिएंटविरूद्ध खूप प्रभावी आहे.

दक्षिण आफ्रिकेतील वैद्यकीय संशोधन परिषेदेचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्राध्यापक ग्लेन्डा ग्रे यांनी सांगितले की, डेल्टा आणि बीटा व्हेरिएंटबाबत बोलायचे झाले तर, आम्हाला असे आढळून आले आहे की जे एँड जे कंपनीची वॅक्सीन डेल्टा व्हेरिएंटविरूद्ध चांगले कार्य करते आणि वेळेबरोबर ही लस आणखी चांगली होत जाते. ग्रे यांनी सांगितले की, जे एँड जे लसीच्या बुस्टर डोसची कोणतीही आवश्यकता असल्याचे अद्याप दिसून आलेले नाही. आतापर्यंतच्या अभ्यासांचा संदर्भ देताना त्यांनी सांगितले की याचा एक शॉट आरोग्य कर्मचार्‍यांना दिल्या जाणार्‍या दोन डोसप्रमाणे कार्य करतो.

यूनिव्हर्सिटी ऑफ विटवॉटरसँड चे प्राध्यापक पेनी मूर यांनी अशी पुष्टी केली आहे की, सध्या अस्तित्त्वात असलेल्या प्रयोगशाळेच्या आकडेवारीवरून असे दिसून येते की सध्या दक्षिण आफ्रिकेत वापरल्या जाणार्‍या लसी बीटाच्या तुलनेत डेल्टा व्हेरिएंटविरूद्ध अधिक चांगले कार्य करतात.

मोठ्या प्रमाणात दक्षिण आफ्रिकेत आता डेल्टा व्हेरिएंटची प्रकरणे समोर येत आहेत. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेत असलेल्या विविध लसी यावर किती प्रभावी आहेत हे समजून घेणे खूप महत्वाचे आहे. त्यांनी सांगितले की, बीटा व्हेरिएंटविरूद्ध फायझर वॅक्सीनची प्रतिपिंडे खरोखरच १,००० चांगली होती, परंतु एस्ट्राजेनेका वॅक्सीनची प्रतिपिंडे १४६ पर्यंत घटली होती. यातून असे लक्षात येते की लस बीटा स्ट्रेनविरूद्ध इतके चांगले कार्य करणार नाही. परंतु जेव्हा आम्ही दक्षिण आफ्रिकेतील डेल्टा व्हेरिएंटच्या दृष्टीने पाहिले, तेव्हा प्रतिपिंडांची संख्या पुन्हा वाढली होती.
Pfizer and Johnson & Johnson vaccines more effective against Delta than beta strains: South African expert

Social Media