मूळव्याधाची कारणे…

बद्धकोष्ठता(Constipation)- शौचविधीच्या वेळेस जोर करणे, कुंथण्यामुळे मुळव्याध होऊ शकते. व्यायामाचा अभाव, आहारात तंतुमय पदार्थांची कमतरता, कडक मलप्रवृत्ती, मलावरोध, सतत अति उष्ण(गुणाने) पदार्थ खाणे, वातकारक व रुक्ष पदार्थ खाणे, अतितिखट सेवन, सतत बैठे काम, अनियमित दिनचर्या, रक्तदोष, वेळच्यावेळी शौचास न जाणे, अति जागरण तसेच व्यायामाचा अभाव, मधुमेह, वृद्धत्वामुळे येणारे पचनाचे दौर्बल्य, गर्भारपण, आमांश अशा अनेक बाबींमुळे गुदद्वारावर जोर द्यावा लागतो.

मूळव्याधाची कारणे काय आहेत…

१. बद्धकोष्ठता- पोट साफ न होणे.
२. शौच्याच्या वेळेस कुंथणे/ जोर करणे.
३. गर्भधारणेदरम्यान गर्भाचे वजन आतड्यावर पडते, त्यामुळे  बद्धकोष्ठता होते.
4. प्रसूतीनंतर प्रसुतीदरम्यान अतिजोर केल्यामुळे मूळव्याध होण्याची शक्यता असते.
५. चुकीची आहार पध्दती- फास्ट फुड व कमी फायबर युक्त आहाराचे सेवन.
६. बराच काळ एका जागी बसून राहणे.
७. लिवर सिरोसीस सारख्या आजारामुळे.
८. अनुवंशिकता.
९. अतिमांसाहार.

अतितिखट आहार खाण्यामुळे मुळव्याध होण्याची शक्यता वाढते.

मूळव्याधाची लक्षणे…(Symptoms of piles)

◼️शौच विधीच्या वेळेस गुदभागी वेदना, आतड्यांच्या नैसर्गिक हालचाली दरम्यान वेदना

◼️शौच विधीच्या वेळेस लाल रंगाचे रक्त पडणे

◼️गुदभागी खाज, गुदातून चिकट पदार्थ येणे आव पडणे.

◼️गुदभागी कोम्ब-मोड-कुडी-गाठ येणे.

◼️पूर्ण पोट साफ न झाल्यासारखे वाटत राहते, गुदभागी काहीतरी आहे असे सतत जाणवत राहते.

अ‍ॅनिमिया… मुळव्याधीमध्ये रक्त-स्राव झाल्यामुळे शरिरातील रक्ताचे प्रमाण कमी होते या अवस्थेला अ‍ॅनिमिया असे म्हणतात.

भूक मंदावणे…
शौच विधीच्या वेळेस गुदभागी वेदना व रक्त-स्राव होतो या कारणामुळे रुग्ण जेवण कमी करू लाग़तो. परंतु याचा तोटा जास्ती होतो, कमी जेवणामुळे बद्धकोष्ठता वाढते तसेच मुळव्याधीचा त्रासही वाढतो.

रुग्णाचे वजन कमी होते.

मुळव्याधीच्या सततच्या त्रासामुळे दैनंदिन कामामध्ये अडथळा निर्माण होतो.

मूळव्याधावरती घरगुती उपचार…
हिरव्या पालेभाज्या, कोशिंबिरी, फळे असे चोथायुक्त पदार्थ आहारात भरपूर प्रमाणात घेणे आवश्यक असते. दही, ताक याचा वापर करणे, रोज भरपूर पाणी पिणे, नाश्ता व जेवण वेळच्यावेळी घेणे हे आवश्यक असते. हा रोग अनेक दिवस लपविला जातो त्यामुळे तो वाढल्यावर लोकं उपचारासाठी धावतात. अ‍ॅलोपॅथीमध्ये  शस्त्रक्रिया हा उपचार आहे.

टिप. हे घरगुती उपचार असले तरीसुद्धा प्रत्येकाची प्रकृती वेगवेगळी असल्यामुळे, प्रत्येकाने आधी आपल्या डॉक्टरांशी सल्लामसलत करावी आणि नंतरच हे उपचार घरी करावेत.!

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

मधुमेहाचा आजार डिटेक्ट झाला असल्यास जीवनशैलीत कोणते बदल करावे ?

Social Media

One thought on “मूळव्याधाची कारणे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *