अरबाज खानचा लोकप्रिय टॉक शो पिंच-२ पुन्हा एकदा होणार प्रसारित….

नवी दिल्ली, Pinch 2 trailer: अरबाज खानचा(Arbaaz Khan) लोकप्रिय टॉक शो ‘पिंच-२’ पुन्हा एकदा प्रसारित होणार आहे. पिंच टॉक शो च्या पहिल्या सत्राला चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. या कार्यक्रमात कलाकार ट्रोलर्सच्या प्रश्नांचे सडेतोड उत्तर देतात. कार्यक्रमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या सत्रात पाहूणे कलाकार म्हणून सलमान खान, अनन्या पांडे, कियारा अडवाणी, आयुष्मान खुराना, फराह खान, राजकुमार राव, टायगर श्रॉफ, फरहान अख्तर, अनिल कपूर उपस्थित राहणार आहेत.

या शो च्या ट्रेलरमध्ये सलमान खान चर्चेचा विषय बनला आहे. दबंग खानने अनेक ट्रोलर्सच्या कमेंट्स वाचल्या. त्यापैकी एक कमेंट अशी होती की, लोकांचा देव बनण्याचा प्रयत्न करू नको. ज्याचे उत्तर देताना सलमानने म्हटले, ‘खरं आहे, फक्त एकच देव आहे आणि तो मी नाही. सलमान यावेळी असेही विचारताना दिसून आला की- ट्रोलर्सने माझ्या पोस्टमध्ये असे काय पाहिले, ज्यामुळे त्यांना असे वाटत आहे की आमचे घर अय्याशीचा अड्डा आहे. तसेच ट्रेलरमध्ये सलमान खान आणि अरबाज खान यांची जुगलबंदी देखील मजेदार दिसत होती. सलमान खानचे चाहते कार्यक्रम प्रदर्शित होण्याच्या प्रतिक्षेत आहेत. ’

‘दोस्ताना2’  चित्रपटात कार्तिक आर्यनच्या जागी दिसणार अक्षय कुमार  – 

अनन्या पांडेने देखील ट्रोलर्सच्या कमेंट्स वाचल्या जेथे लोकांनी म्हटले होते की तिने तिचे नाव फेक पांडे ठेवले पाहिजे. तसेच कियारा अडवाणीच्या अभिनयावर लोकांनी अनेक टिप्पण्या केल्या होत्या. फराह खान ने नेपोटिझमवर भाष्य करत म्हणाली की तुम्ही नेपोटिझमविषयी बोलता परंतु तुम्हाला देखील शाहरुख खानच्या मुलीचे किंवा करीनाच्या मुलाचेच फोटो पहायचे असतात. फराहने एक कमेंट वाचली त्यामध्ये ट्रोल्सने तिच्या लठ्ठपणाविषयी (बॉडीशेम) म्हटले होते. कार्यक्रमाचा ट्रेलर मजेदार आहे. ट्रेलरमुळे चाहत्यांचा उत्साह आणखी वाढला आहे. चाहते पिंच-२ शो 21 जुलैपासून झी 5वर पाहू शकतील.
Pinch 2 trailer: Salman’s question to the troll – Why did I tell my house as a haunt of debauchery?.


कॉकटेल चित्रपटातील ‘वरोनिका’ने माझे व्यावसायिकदृष्ट्या आयुष्यच बदलले आणि मला वैयक्तिकरित्या प्रभावित केले : दीपिका पादुकोण –

कॉकटेल चित्रपटातील ‘वरोनिका’ने माझे व्यावसायिकदृष्ट्या आयुष्यच बदलले : दीपिका पादुकोण

तमिळ सुपरहिट चित्रपट ‘रत्सासन’ च्या हिंदी रिमेकमध्ये अक्षय कुमारची वर्णी… –

तमिळ सुपरहिट चित्रपट ‘रत्सासन’ च्या हिंदी रिमेकमध्ये अक्षय कुमारची वर्णी…

Social Media