पाईपलाईन दुरुस्ती करताना वीजेचा धक्का लागून पालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू तर पाच कर्मचारी जखमी.

मुंबई : मुंबईत पाईपलाईनच काम सुरू असताना वीजेचा धक्का लागून पालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत पाच कर्मचारी जखमी झाले आहे. जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुंबईतील चेंबूर परिसरातील सुमननगरजवळ मेट्रोचे काम सुरू आहे. या भागात पाण्याची पाईपलाईन फुटली होती. या पाईपलाईनच्या दुरुस्तीच काम सुरू होते. आज सकाळी १२ वाजून ५० मिनिटांच्या  सुमारास काम करण्यासाठी कर्मचारी पोहोचले होते. तेव्हा अचानक ७ कर्मचाऱ्यांना विजेचा धक्का बसला. यात दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला . तर इतर पाच जण हे यातून थोडक्यात बचावले आहे.
या दुर्घटनेत गणेश उगले  (वय ४५) आणि अमोल काळे (४०) या दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. जर इतर पाच जण जखमी झाले आहे.

नाना पुकळे (41), महेश जाधव (40), राकेश जाधव(39) अनिल चव्हाण (43), नरेश अधांगळे(40) अशी जखमींची नाव आहे. जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. ही घटना नेमकी कशी आणि का घडली याचा तपास करण्यात येत आहे.

Social Media