पालघर : पीएमसी बैंक ( PMC BANK ) घोटाळया संबंधात वसईचे आमदार हितेंद्र ठाकुर यांच्या मालकीच्या विवा ग्रुप ( Viva Group ) वर आज ईडी अर्थात सक्तवसूली संचनालय ( ED ) ची छापेमारी सुरु आहे. प्रवीण राऊत आणि ठाकुर कुटुंबियांमध्ये काही आर्थिक संबंध असल्यानं त्यांचा ही या पीएमसी बैंक घोटाळयात सहभाग असल्याचा ईडीला संशय असल्यानं आज सकाळी ईडीनं विवा ग्रुपच्या पाच ठिकाणावर छापेमारी केली असल्याचं सांगण्यात येत आहे. वसई, विरार आणि पालघर भागातल्या ठिकाणावर ही छापेमारी करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
तर या विषयावर प्रतिक्रिया देताना आमदार हितेंद्र ठाकुर सांगितले की, ईडी त्यांचे काम करेल. त्यांना जे तपासायचे ते तपासतली. जे काही चेक चे व्यवहार आहेत त्यांचे जस्टिफिकेशन आम्ही देवू. ईडीने माझ्या मागे लागण्या इतका मोठा नेता मी नाही. हा पण त्यांच्यामुळे मोठे बनण्याची संधी मात्र मिळाली.
बहुजन विकास आघाडी पक्षाचे अध्यक्ष आणि वसई विधानससभेचे आमदार हितेंद्र ठाकुर यांचा हा विवा ग्रुप आहे. विधानसभेत ठाकुर कुटुंबातुन 2 आमदार आहेत. तसचं वसई – विरार भागांत ठाकुर कुटुंबाचा मोठा दबदबा दिसून येतो. तर वसई – विरार महानगर पालिकेवर देखील हितेंद्र ठाकुर यांच्या बहुजन विकास आघाडीची सत्ता आहे.
Tag-Hitendra Thakur/Vasai/PMC/ED/