भंडारा : आजपण 17 वर्षांपासून एक योद्धा संघर्ष करीत आहे. जीवनासोबत त्यांच्याकडून खुप काही शिकण्यासारखं आहे. त्यांचे नाव आहे, महाराष्ट्र पोलिस अंमलदार श्री, सचिन वसंतरावजी सोनुले व त्यांचे सोबती पोलीस अंमलदार जयंत हुकरे साहेब.
आजच्या दिवशीच बेवारटोला येथे नक्षलवाद्यांनी भुसुरूंग स्फोट घडवून आणला होता. त्या स्फोटात आमचे कित्येक जवान शहीद झाले होते. आजपण तो भ्याड हल्ला विसरण्यासारखा नाही. ही कहाणी आहे एका खऱ्या योध्याची ज्याच्या शुरतेची कितीही वेळा स्तुती करू ती कमीच आहे. बेवारटोला येथे नक्षलवाद्यांनी भुसुरुंग स्फोट घडविला. त्या क्षणी बस एकच व्यक्ती बचावला होता. नक्षलवाद्यांनी स्फोट घडविल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पोलिसांचे शव ते जनावर निघ्रुन रित्या बंदुकांची संगीन टोचुन पाहत होते. प्रत्येक पोलिसांच्या पायात, पोटात त्यातला एक योद्धा म्हणजे ज्याला जीवनदान मिळाले. ईश्वराकडून तो म्हणजे सचिन वसंतराव सोनूले आमचा भाऊ रक्ताच्या थारोळ्यात पडूनच होता जख्मी असतांना सुद्धा ज्या वेळेस नक्षलवाद्यांनी त्यांच्या पायात बंदुकांची संगीन टोचली, त्या क्षणाला स्वत:च्या जिवाला वाचविण्याकरीता क्षणात स्वत:चे जीव मुठित घेऊन स्वतःचे श्वास रोखून संगीनचे घाव सोसले. मग सर्व पोलीस मेलेले आहेत असे समजून ते राक्षस तिथुन निघुन गेले.
मग काही वेळानंतर पोलिसांचा ताफा आला व शहीद झालेल्या पोलिसांना व सचिन भाऊंना दवाखान्यात तत्काळ हलविन्यात आले. म्हणतात ना “जाको राके साईया मार सके ना कोई” तर हाच तो उदाहरण. ईश्वर त्या क्षणी सचिन दादा च्या पाठीशी उभा होता यमदूताला येऊन पन ईश्वराने परत पाठवीले. आजपन हा योद्धा माझ्या सारख्या व तुमच्या सारख्या कित्येक लोकांना तरुण पिढीला संदेश देतो की जवान म्हणजे काय त्याचे देशा प्रति कर्तुत्व कशे असतात तो किती धैर्यशाली असतो हे प्रत्येक पिढीला शिकण्यासारखे आहे.
RESPECT ALL KHAKIS MAN खाकी वर्दितल्या प्रत्येक योद्धाला माझा मानाचा सलाम…. ते आहेत म्हणून आम्ही आपल्या घरी सुरक्षित आहोत, ते आहेत म्हणून आपल्या आया-बहिणी, आपली बायको रस्त्यावर सुरक्षित आहेत गर्व आहे मला मी POLICE BOYS असल्याचा.
जैराम.श्री.बावने
अनाथांची माय पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांचे स्वप्न पूर्ण होणार