मुंबई : मुर्तीकार आणि गणेशोत्सव समन्वय समितीच्या सदस्यांसह आमदार अँड आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली भेटलेल्या शिष्टमंडळाने मागणी केल्याप्रमाणे पीओपी वापरा बाबत तोडगा काढण्यासाठी केंद्रीय पर्यावरण विभागातर्फे अभ्यास गट स्थापन करण्यात आला आहे. त्यामुळे याबाबत लवकरच मार्ग निघेल अशी अपेक्षा आहे.
दिल्ली आयआयटीच्या केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटचे प्रमुख प्रा. के. के. पंत, प्रो. सी बालोमाझमडर, यांच्या सह पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोग शाळेच्या डाँ शुभांगी उंबरकर, डाँ. मोहन डोंगरे यांच्यासह वॉटर क्वलिटी मॅनेजमेंट विभागाचे सेक्रेटरी जे. चंद्राबाबू यांचा या कमिटी मध्ये समावेश आहे.
पीओपीवरील बंदी मुळे हजारो गणेश आणि दुर्गा मुर्तीकार अडचणीत आले आहेत. या व्यवसायात अनेक कारागीर, मुर्तीकार, कारखानदार यांचा रोजगार अवलंबून आहे. कोरोना मुळे यावर्षी हा उद्योग अडचणी आला आहे. त्यामुळे याबाबत तोडगा निघावा, अशी विनंती करीत नुकतेच मुर्तीकार आणि सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे शिष्टमंडळाने आमदार अँड आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेतली होती. यामध्ये गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अँड नरेश दहिबावकर महाराष्ट्र गणेशोत्सव महासंघाचे अध्यक्ष जयेंद्र साळगावकर, अखिल सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष हितेश जाधव यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. त्यावेळी अभ्यास गट स्थापन करण्यात येईल असे मंत्र्यांनी सांगितले होते. त्यानुसार केंद्रीय पर्यावरण विभागाने कमिटी गठीत केली आहे.
Tag-Committee formed to settle the POP