PPC 2023 : परिक्षा पे चर्चा 2023 मध्ये सहभागी होण्यासाठी करा नोंदणी, 30 डिसेंबर ही शेवटची तारीख 

मुंबई : वार्षिक कार्यक्रम परीक्षा पे चर्चा (PPC) ची सहावी आवृत्ती, जिथे पंतप्रधान मोदी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधतात आणि परीक्षेचा ताण कमी करण्याविषयी बोलतात, नवी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये टाऊन हॉल स्वरूपात आयोजित केले जाईल.

PPC कार्यक्रमासाठी निवड होण्यासाठी, विद्यार्थ्यांना ऑनलाइन सर्जनशील स्पर्धेत भाग घ्यावा लागेल जी 25 नोव्हेंबरपासून सुरू होईल आणि 30 डिसेंबर रोजी संपेल. ही स्पर्धा इयत्ता 9 ते 12 च्या विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसाठी खुली आहे. अर्जदारांना त्यांच्या प्रवेशिका innovateindia.mygov.in/ppc-2023 येथे सबमिट कराव्या लागतील.

विजेत्यांना प्रमाणपत्र

सुमारे 2050 विजेत्यांना एनसीईआरटीच्या संचालकांनी स्वाक्षरी केलेले प्रमाणपत्र आणि ‘परीक्षा योद्धा’ पुस्तक मिळेल. NCERT द्वारे शॉर्टलिस्ट केलेले निवडक प्रश्न कार्यक्रमात असू शकतात.

उपक्रमाला चालना देण्यासाठी, त्यांच्या सोशल मीडिया हँडलचा वापर करण्यासाठी आणि कार्यक्रमाबाबत जनजागृती करण्यासाठी शाळांना अभिनव उपाय अवलंबण्याची विनंती करण्यात आली आहे.

पंतप्रधान मोदी दरवर्षी विद्यार्थ्यांशी संवाद साधतात

गेल्या वर्षी १ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांशी परीक्षेबाबत चर्चा आणि संवाद साधला होता. यावेळी पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, मला आशा आहे की यावर्षी तुम्हाला परीक्षेचा ताण नसेल. पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना येणाऱ्या सणांसाठी शुभेच्छा दिल्या आणि परीक्षेच्या मधोमध सण आला तर आपण सणाचा आनंद घेऊ शकत नाही, पण परीक्षेला सण मानला तर त्याचा पुरेपूर आनंद घेता येईल.

Social Media