प्रशांत किशोर शरद पवारांच्या भेटीला; दिल्लीत घडामोडींना वेग

नवी दिल्ली : राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी पुन्हा आज एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. शरद पवार सध्या दिल्लीत असून तिथे ते राष्ट्रीय नेत्यांच्या भेटी घेणार आहेत. दरम्यान प्रशांत किशोर- पवार यांच्यातील भेटीमुळे पुन्हा एकदा देशपातळीवरील राजकारणात खळबळ उडाली आहे.

काही दिवसांपूर्वी प्रशांत किशोर यांनी शरद पवारांचे निवासस्थान असलेल्या मुंबईतील सिल्वर ओक वर तब्बल साडेतीन तास चर्चा केली होती. देशातील एकूण राजकीय परिस्थिती, मोदींविरोधातील जनतेच्या मनातील रोष, त्यातील निर्माण झालेली तिसऱ्या आघाडीची शक्यता यावर तेव्हा सविस्तर चर्चा झाल्याची माहिती होती.आजच्या बैठकीत नेमकी काय चर्चा होते आणि त्याचे परिणाम काय दिसतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .

Social Media