गर्भवती महिला देखील कोव्हिड-१९ लस घेऊ शकतात, आरोग्य मंत्रालयाने जारी केली मार्गदर्शक तत्वे

नवी दिल्ली : Corona Vaccination : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गर्भवती महिलांना (Pregnant women)कोरोना विषाणूविरोधी लस घेण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. या मार्गदर्शक सूचनांनुसार, कोव्हिड-१९ लस(COVID-19 vaccine) गर्भवती महिलांसाठी सुरक्षित आहे. गर्भवती महिलांच्या लसीकरणाविषयी जागतिक आरोग्य संस्थेने (WHO) शिफारस केली होती, त्यामुळे काही आठवड्यांनंतर हा निर्णय आला आहे. केंद्रीय मंत्रालयाने सर्व गर्भवती महिलांना स्वतः CoWIN पोर्टलवर नोंदणी करण्यास किंवा कोव्हिड-१९ लसीकरण (COVID-19 vaccine)केंद्रात नोंदणी करण्याचा सल्ला दिला आहे. गर्भवती महिलांसाठी नोंदणी प्रक्रिया सामान्य असेल.

गर्भवती महिलांच्या लसीकरणाविषयी आरोग्य मंत्रालयाने जारी केली मार्गदर्शक तत्वे…

Health Ministry issues guidelines on vaccination of pregnant women…

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, “गर्भधारणेमुळे कोव्हिड-१९ संसर्गाची जोखीम वाढत नाही. बहुतांश गर्भवती महिला एसिम्टोमॅटिक (प्रथम विषाणूजन्य लक्षणे) असतील किंवा त्यांना सौम्य आजार होईल, परंतु त्यांचे आरोग्य वेगाने खालावू शकते आणि त्याचा गर्भावरही परिणाम होऊ शकतो. ’ कोव्हिड-१९ संसर्गापासून बचाव करण्यासाठी सर्व खबरदारी घेणे आवश्यक आहे आणि कोरोनाविरूद्ध लसीकरण मोहिमेत सामील होऊन लस घेणे गरजेचे आहे.

कोरोनाचा मुलांच्या तुलनेत मुलींवर अधिक प्रभाव : अभ्यास – 

एखाद्या गर्भवती महिलेस जर विषाणूचा संसर्ग झाला असेल, तर मंत्रालयाने सांगितले आहे की बहुतांश (>90 टक्के) गर्भवती महिला रूग्णालयात दाखल न होता देखील बऱ्या होतात, तर काही महिलांचे आरोग्य वेगाने खालावू शकते. लक्षणे असलेल्या गर्भवती महिलांमध्ये गंभीर आजार आणि मृत्यूचा धोका वाढतो. गंभीर आजारात इतर सर्व रूग्णांप्रमाणे गर्भवती महिलांनाही रूग्णालयात दाखल होण्याची आवश्यकता असेल.

Blood Sugar नियंत्रित करण्यासाठी करा ‘या’ पदार्थांचे सेवन…. – 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोव्हिड-१९ लसीच्या दुष्परिणामांविषयी देखील सांगितले आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की, कोरोनाची लस सुरक्षित आहे आणि लसीकरणामुळे गर्भवती महिलांचा कोव्हिड-१९ संसर्गापासून बचाव होतो. एखाद्या औषधाप्रमाणेच, या लसीचे दुष्परिणाम होऊ शकतात, जे सामान्यत: सौम्य असतात. यामध्ये सौम्य ताप, इंजेक्शन दिलेल्या जागी थोड्याशा वेदना होऊ शकतात.
Corona Vaccination: Pregnant women can also get COVID-19 vaccine, Ministry of Health issued guidelines.


डेल्टा प्लस व्हेरिएंटला सभाव्य तिसऱ्या लाटेचे कारण मानने चुकीचे –

डेल्टा प्लस व्हेरिएंटला सभाव्य तिसऱ्या लाटेचे कारण मानने चुकीचे : आयसीएमआर वैज्ञानिक

डेल्टा व्हेरिएंटने लोकांची चिंता वाढविली, आतापर्यंत ८५ देशांमध्ये आढळल्याची नोंद : डब्ल्यूएचओ –

वेगाने पसणाऱ्या Delta variantने लोकांची चिंता वाढविली आतापर्यंत ८५ देशांमध्ये आढळल्याची डब्ल्यूएचओने दिली माहिती

Social Media