मुंबई: प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra)आणि निक जोनस (Nick Jonas)यांनी भारतासाठी फंडरेझर टुगेदर फॉर इंडियाद्वारे २२ कोटी रूपयांचा निधी जमा केला आहे. याबाबतची माहिती प्रियांकाने सोशल मीडियावर दिली आहे. प्रियांका निक ने गिव्ह इंडिया सोबत मिळून ही रक्कम जमा केली आहे जेणेकरून देशाला कोव्हिड-१९ (Covid-19) वर मात करण्यास मदत मिळू शकेल. आता ही रक्कम वापरण्याची वेळ आली आहे, प्रियांकाने गिव्ह इंडियाचे सीईओ यांना म्हटले आहे की हे पैसे कोठे वापरायचे आहेत, ते विचारण्यास सांगितले आहे.
प्रियांकाने लिहिले- अतुल सतीजा यांनी गिव्ह इंडियाच्या सीईओ यांच्यासोबत झालेल्या चर्चेत काही प्रश्नांची उत्तरे दिली आणि त्या क्षेत्रांसदर्भात देखील चर्चा केली, जेथे आमच्या फंडरेझर टुगेदर फॉर इंडियाद्वारे जमा करण्यात आलेल्या निधीची सर्वात अधिक आवश्यकता आहे. विशेष म्हणजे जमा केलेला निधी भारतात ऑक्सीजनची कमतरता दूर करण्यासाठी आणि लसीकरणासाठी वापरला जाणार आहे.
प्रियांकाने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना ही लस पाठविण्यास सांगितले होते, पोस्ट सामायिक करताना तिने अमेरिकेतील सरकारी अधिकाऱ्यांना भारताला ही लस देण्यास सांगितले होते. तिने असेही म्हटले होते की, माझ्या देशाची परिस्थिती खूप गंभीर आहे. तिने पोस्ट शेअर करत म्हटले, ‘मला खूप दुःख झाले आहे. ’ भारत कोरोना ग्रस्त आहे आणि अमेरिकेने ५५० मिलियनपेक्षा अधिक लसींची मागणी केली आहे. तथापि एवढी आवश्यकता नाही.
Priyanka Chopra and Nick Jonas have raised Rs 22 crore through a fund razor for India.
सोनू सूदच्या फोटोवर दूधाचा अभिषेक –
सोनू सूदच्या फोटोवर लोकांनी केला दूधाचा अभिषेक; कविताने केला संताप व्यक्त!