छगन भुजबळ यांच्या घरासमोर काळी रांगोळी काढून विद्यापीठ विधेयकाचा निषेध

नाशिक : नाशिक महाविकास आघाडी सरकारने विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयक घाईघाईने पारित करून विद्यापीठे ही राजकारणाचा अड्डा बनविण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे भविष्यात शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार निर्माण होण्याची शक्यता असल्याचा आरोप करीत भारतीय जनता युवा मोर्चा ने पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या घरासमोर काळी रांगोळी काढून आगळावेगळा निषेध नोंदवला.

या संदर्भात मुख्यमंत्र्यांना दहा लाख पत्र पाठविण्याचा तसेच उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना मिस कॉल ई-मेल मेसेज द्वारे निषेध व्यक्त केला जात असून राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्यांची दखल घ्यावी यासाठी आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून आज नाशिक महानगर भारतीय जनता युवा मोर्चा युवती विभागाने नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या घरासमोर पहाटे निषेधाची काळी रांगोळी काढली.

यावेळी भा ज पा युवा शहर सरचिटणीस ऋषिकेश आहेर, शहर युवती प्रमुख साक्षी दिंडोरकर, मयुरी शुक्ल , लीना मोरे हे उपस्थित होते . या रांगोळी बद्दल छगन भुजबळ यांच्याकडून अद्याप पर्यंत कोणतीही प्रतिक्रीया व्यक्त झालेली नाही .

Social Media