पुणे : पुणे मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असून त्यासाठी उद्या ते पुण्यात दाखल होत आहेत.
हा प्रकल्प पुण्यातील शहरी गतिशीलतेसाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देईल अशी अपेक्षा आहे. 2016 मध्ये पंतप्रधानांच्या हस्ते या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली होती.
पुणे महानगरपालिकेच्या आवारात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण ही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. याशिवाय पंतप्रधान मोदी अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी करणार असून आर के लक्ष्मण आर्ट गॅलरी संग्रहालयाचेही उद्घाटन करणार आहेत.
सिम्बायोसिस विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याचा शुभारंभ देखील पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे.