Pushpa 2 The Rule : ‘पुष्पा 2’ मधील आयटम साँग ‘Kissik’ प्रदर्शित

Pushpa 2 The Rule : सुपरस्टार अल्लू अर्जुनचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘पुष्पा 2: द रुल’ची जबरदस्त क्रेझ आहे. ‘पुष्पा 2: द रुल’ लवकरच रिलीज होणार आहे. येत्या 5 डिसेंबरला हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘पुष्पा’ सिनेमात समांथा रुथ प्रभूच्या ‘ऊं अंटावा…’ गाण्याने आग लावली होती. आता ‘पुष्पा 2: द रुल’मधील अभिनेत्री श्रीलीलाचं (Sreeleela) आयटम साँग ‘Kissik’ प्रदर्शित झालं आहे.

‘Kissik’ गाण्यात आयकॉन स्टार अल्लू अर्जुन आणि श्रीलीलाचा जबरदस्त स्वॅग पाहायला मिळतोय. चेन्नईमधील एका भव्य कार्यक्रमात हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. अल्लू अर्जुनसोबत श्रीलीलाची केमिस्ट्रीही दिसतेय. या गाण्याने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. श्रीलीलाने तिच्या बोल्ड अदांनीच चाहत्यांना खूश केलं आहे. गाणं प्रदर्शित होताच काही क्षणात ते व्हायरल झालं आहे.

ऊं अंटावा…’ मधील सामंथा रुथ प्रभू आणि अल्लू अर्जुन यांच्या केमिस्ट्रीने चाहत्यांनाही वेड लावले होते. आजही लोकांना ते गाणं ऐकायला आवडतं. ते गाणे सुपरहिट ठरले. त्यामुळेच चाहते चित्रपटाच्या नव्या आयटम साँगची आतुरतेने वाट पाहत होते. या म्युझिक व्हिडीओवर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी या गाण्याची तुलना ‘ऊं अंटावा…’ सोबत केली आहे. श्रीलीलाचं गाणं हे फायर आहे तर समांथाचं गाणं हे वाइल्ड फायर आहे, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

श्रीलीलाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती शेवटची ‘गुंटूर कारम’ या सिनेमात पाहायला मिळाली होती. या चित्रपटासाठी तिने 4 कोटी रुपये मानधन घेतल्याचे सांगितले जाते. यातील तीच आयटम साँग ‘कुर्ची मदातापेट्टी’ चांगलंच गाजलं होतं. आता तिच्या हातात ‘पुष्पा 2’ व्यतिरिक्त मास जथारा, रॉबिन हुड आणि उस्ताद भगत सिंग हे सिनेमा आहेत. श्रीलीला ही एक प्रशिक्षित भरतनाट्यम नृत्यांगना आहे आणि तिने वयाच्या तिसऱ्या वर्षापासून त्याचा सराव सुरू केला होता.

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, श्रीलीलाला ‘Kissik’ या गाण्यासाठी 2 कोटी मानधन मिळाले आहे. श्रीलीलाच्या आधी या आयटम साँगसाठी अभिनेत्री श्रद्धा कपूर हिला विचारण्यात आल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र तिने यासाठी 5 कोटी रुपये मानधन मागितले होते. याच कारणामुळे श्रद्धाच्या हातून हे डान्स नंबर निसटले आणि श्रीलीलाला फायनल करण्यात आले.

 

Pushpa 2 Trailer: “पुष्पा नाम नही ब्रँड है”, अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ‘पुष्पा २’चा ट्रेलर प्रदर्शित

Social Media

One thought on “Pushpa 2 The Rule : ‘पुष्पा 2’ मधील आयटम साँग ‘Kissik’ प्रदर्शित

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *