‘Pushpa the Rise’: अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ बॉक्स ऑफिसवर 100 कोटी क्लबमध्ये! मोडले सर्व रेकॉर्ड

मुंबई : दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा द राइज'(‘Pushpa the Rise’) या चित्रपटाने अनेक विक्रम केले आहेत. हा चित्रपट गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित झाला होता. मात्र, असे असूनही चित्रपटाची जादू कमी होताना दिसत नाही. रिलीजसोबतच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील अनेक रेकॉर्ड मोडून आणखी एक टप्पा गाठला आहे. ‘पुष्पा: द राइज’ (‘Pushpa the Rise’)चित्रपटाने 9 आठवड्यांत 1.39 कोटींची कमाई केली आहे.

विशेष म्हणजे या चित्रपटाने अल्पावधीतच अनेक विक्रम केले आहेत. बॉक्स ऑफिसवरील सर्व रेकॉर्ड मोडीत काढत या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने 100 कोटी क्लबमध्ये आपला ठसा उमटवला आहे. या चित्रपटाने जगभरात 300 कोटींचा आकडा आधीच पार केला आहे. चित्रपटाची लोकप्रियता पाहून निर्मात्यांनी चित्रपटगृहांनंतर आता OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime Video वर चित्रपट प्रदर्शित केला आहे.

चित्रपटांच्या या कलेक्शनबद्दलही सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे, कारण चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होऊनही चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. मात्र, या आठवड्यात संथगतीने सुरू झालेला पुष्पाचा व्यवसाय येत्या आठवडाभरात आणखी घसरण्याची शक्यता आहे.

अल्लू अर्जुनचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘पुष्पा'(‘Pushpa) 17 डिसेंबर 2021 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. अल्लू अर्जुन व्यतिरिक्त, या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि फहद फासिल मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे.

Social Media