दिशा पाटणी ने शेअर केले ‘राधे’ चित्रपटाच्या टायटल ट्रॅक गाण्याचे बीटीएस फोटोज  

मुंबई : अभिनेता सलमान खानचा( Salman Khan) बहुप्रतिक्षित चित्रपट राधे : ‘योर मोस्ट वॉन्टेड भाई’विषयी चर्चेत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची गाणी सोशल मीडियावर चांगलीच गाजत आहेत. आता दिशा पटानीने बीटीएस व्हिडिओ आणि चित्रपटाच्या टायटल ट्रॅक सॉन्ग राधेचे (Radhe)फोटो शेअर केले आहेत.

स्टनिंग दिशा पाटणी(Stunning Disha Patani)

अभिनेत्री दिशा पाटनीने(Disha Patani) तिच्या अधिकृत इंस्टाग्राम स्टोरी आणि तिच्या फॅन्स अकाऊंटमध्ये चित्रपटाचा टायटल ट्रॅक सॉन्ग राधेचा बीटीएस व्हिडिओ शेअर केला आहे. एका व्हिडिओमध्ये अभिनेत्री डान्स स्टेप्स करताना दिसली आहे.तर दुसर्‍या व्हिडिओमध्ये ती पलंगावर बसून स्टेप्स करताना दिसत आहे. तसेच, तिने तिच्या गाण्यासाठी केलेल्या मेकअपची छायाचित्रेही शेअर केली आहेत, या चित्रांमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोमध्ये ती गळ्यात चैन आणि रिप्ड जीन्स परिधान केलेली  दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bollywood Binge (@bollywoodbinge)

 


Indian Idol 12 : किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांची गाणी प्रदर्शित करणार हिमेश रेशमिया – SanvadMedia लवकरच करणार रिलीज


चित्रपटाचे टायटल ट्रॅक सॉन्ग राधे 5 मे ला प्रदर्शित झाला. हे गाणे सलमान खान आणि दिशा पाटणीवर चित्रीत करण्यात आले आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडी साजिद-वाजिदच्या साजिदने हे गाणे संगीतबद्ध केले आहे. टायटल ट्रॅक गाणे साजिद यांनी लिहिले आहे, हे गाणे मुदस्सर खान यांनी कोरिओग्राफ केले आहे. हे गाणे 2009 च्या वांटेड चित्रपटाच्या मूळ ट्रॅकवर बनवले गेले आहे.

 

या गाण्याआधी चित्रपटाची ‘सीटी मार’ आणि ‘दिल दे दिया’ ही दोन गाणी रिलीज झाली आहेत. सॉन्ग सीटी मारमध्ये दिशा पाटनीने सलमान खानसोबत एक उत्तम डान्स केला आहे. तर त्याचवेळी जॅकलिन फर्नांडिस सलमानसोबत दिल दे दियामध्ये स्टेज परफॉर्मन्स देताना दिसली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pratiksha Nair (@_pratikshanair_)

या अ‍ॅक्शन फिल्मचे दिग्दर्शन बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक प्रभुदेवा करीत आहेत. एनकॉऊंन्टर स्पेशलिस्ट आणि 97 एन्काऊंटर केलेले पोलिस अधिकारी राधेच्या भूमिकेत भाईजान म्हणजेच  सलमान खान दिसणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री दिशा पाटनी, रणदीप हूडा आणि प्रसिद्ध अभिनेता जॅकी श्रॉफ महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.

सलमान खानचा हा चित्रपट 13 मे रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म झी 5 वर रिलीज होणार आहे कारण कोरोना व्हायरसच्या वाढत्या घटनांमुळे लॉकडाऊन सुरू आहे.

Actor Salman Khan’s much awaited film Radhe is in the news for ‘Your Most Wanted Bhai’. The songs of the recently released film are doing well on social media. Now Disha Patani has shared bts video and photos of the film’s title track song Radhe.

Social Media