सणासुदीच्या हंगामात 20 ऑक्टोबरपासून रेल्वे चालवणार 196 जोड्या विशेष गाड्या

नवी दिल्ली : उत्सवाच्या हंगामात प्रवाशांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वे 20 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत 196 जोड्या विशेष गाड्या सोडणार आहे. यासाठी विभागीय रेल्वेच्या प्रस्तावाला रेल्वे मंत्रालयाकडून मान्यता मिळाली आहे. या गाड्यांचे भाडे खास गाड्यांच्या भाड्यांइतकेच असेल.परंतु या गाड्या मर्यादित काळासाठी चालविण्यात येतील. या गाड्यांमध्ये आठवड्यातून एकदा, आठवड्यातून चार वेळा दररोज धावणाऱ्या गाड्यांचा समावेश असेल.

उत्सव विशेष गाड्यांची घोषणा करीत रेल्वेने सांगितले की, या सर्व गाड्या सुपरफास्ट गाड्या असल्याने त्यांचा वेग कमीतकमी 55 किमी प्रतितास असेल. त्याचबरोबर या विशेष गाड्यांच्या तिकिटांचे दर इतर विशेष गाड्यांच्या बरोबरीने ठेवले जातील. रेल्वेने विभागीय रेल्वेला जास्त गाड्यांसह एसी-3 कोच चालविण्याचे निर्देश दिले आहेत.

विशेष म्हणजे रेल्वेने सध्या सर्व सामान्य प्रवासी गाड्या अनिश्चित काळासाठी रद्द केल्या आहेत. कोरोना साथीच्या वेळी टाळेबंदीमुळे या गाड्या 22 मार्चपासून रद्द करण्यात आल्या आहेत. नंतर रेल्वेने १२ मे पासून दिल्लीला देशाच्या विविध भागांशी जोडणारी 15 विशेष राजधानी एक्सप्रेस आणि १ जूनपासून १०० लांब अंतराच्या गाड्या चालवण्यास सुरुवात केली. १२ सप्टेंबरपासून आतापर्यंत रेल्वे अतिरिक्त 80 गाड्या चालवित आहे. राज्य शासनाच्या गरजा आणि साथीच्या परिस्थितीचा विचार करता रेल्वेने प्रवाशांना सुविधा पुरविल्या आहेत.

यापूर्वी, रेल्वे मंडळाचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. के. यादव यांनी या महिन्याच्या सुरुवातीला सांगितले होते की आम्ही झोनच्या सरव्यवस्थापकांशी बैठक घेतली असून त्यांना स्थानिक प्रशासनाशी सल्लामसलत करून कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या स्थितीचा आढावा घेण्याचे निर्देश दिले. त्यांच्याकडून अहवाल मागविण्यात आला असून सणासुदीच्या कालावधीत किती विशेष गाड्या चालवल्या जातील यावर आधारित निर्णय घेण्यात येईल. सध्या आमच्या अंदाजानुसार अंदाजे 200 गाड्या धावतील पण ही संख्या आणखी जास्त असू शकेल. प्रवासी गाड्यांचा प्रश्न आहे तोपर्यंत आम्ही दररोज गाड्यांची गरज, रेल्वे वाहतूक आणि कोविड -19 च्या परिस्थितीचा आढावा घेऊ असे ते म्हणाले होते. ज्या ठिकाणी आवश्यकता असेल तेथे गाड्या चालवू असेही ते म्हणाले.

 

Social Media