नागपूरात रात्रभर पाऊस, जनजीवन विस्कळित…

नागपूर : नागपुरात काल सकाळी पावसाने जोरदार हजेरी लाऊन नागपूरातील जनजीवन विस्कळित केले होते..मात्र तरीही संपुर्ण रात्रभर पावसाची रिमझिम सुरु होती.. सतत पडत असलेल्या या पावसामुळं अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले असल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. कामठी रोड वरील मा उमिया औद्योगिक वसाहतीत असलेल्या अनेक मोठ्या कंपन्यांचे सामान पावसाचा पाण्यात भिजल्याने करोडो रुपयांचे नुकसान झाल्याचे संगण्यात येत आहे..

या पावसाचा फटका शेतकऱ्यांनाही बसला असून सोयाबिन पीक, कपाशी, भाजीपाला इत्यादी पीके पण्याखाली आल्याने शेतजमीन खरडली आहे.. जिह्यातील वेणा नदीला पूर आला असून नांद धरणाचे सात दरवाजे उघडण्यात आले आहे.. नाग नदी सुद्धा ओसंडून वाहत आहे..शहारातील दीक्षाभूमी परिसरातील विकास कामांचा खड्यांमध्येही पाणी साचले असून सर्वत्र चिखल झाला आहे.. नदी काठचा नागरिकांना संपुर्ण रात्र जागून काढावी लागली आहे. सध्या नागपुर जिल्ह्यात रिमझिम पाऊस सुरूच आहे..

Social Media