१ ऑक्टोबर पासून राजभवन भेट पुन्हा सुरु

मंबई : तीन महिन्यांच्या पावसाळी अवकाशानंतर दिनांक १ ऑक्टोबर पासून राजभवन(Raj Bhavan) भेटीची योजना पुन्हा सुरु होत आहे. दिनांक १० सप्टेंबर पासून राजभवनाच्या संकेतस्थळावर यासाठी नोंदणी सुरु करण्यात आली आहे. राजभवन(Raj Bhavan) भेटीची वेळ सकाळी ६ ते सकाळी ८.३० ही असेल व प्रतिदिवशी ३० लोकांना भेट देता येईल.

राजभवन हेरिटेज टूर(heritage tour of Raj Bhavan) मध्ये सूर्योदय गॅलरी, देवी मंदिर, भूमिगत बंकर, क्रांतिकारकांचे दालन, दरबार हॉल, जलविहार सभागृह व महाराष्ट्र राज्य स्थापना स्मारक येथे भेट  येईल.  राजभवन भेटीचे दिवस मंगळवार ते रविवार हे असतील.

सोमवारी तसेच शासकीय सुट्ट्यांच्या दिवशी राजभवन भेट बंद असेल असे राजभवनातर्फे कळवण्यात आले आहे. दिवाळीमुळे २२ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत भेट देता येणार नाही.

 

The heritage tour of Raj Bhavan at Malabar Hill will resume from 1 October. The booking for Raj Bhavan visit has started from today. The visits were closed during monsoon.The visits will remain open on all days except Mondays and official holidays. There will be a Diwali break of 7 days from 22 to 28 October.

The timing of the visits will be 6 am to 8.30 am. The tour will include visit to the Sunrise Gallery, Devi Mandir, the Underground Bunker, the Gallery of Revolutionaries, Darbar Hall, Jal Vihar and the Maharashtra Formation memorial.

Social Media