मुंबई : राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रजनीश सेठ(Rajneesh Seth) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संजय पांडे यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार होता. यावरून न्यायालयानेही सरकारवर ताशेरे ओढले होते. त्यामुळे अखेर सरकारकडून रजनीश सेठ(Rajneesh Seth) यांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
रजनीश सेठ हे १९८८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी(IPS Officer) आहेत. आझाद मैदान दंगलीच्या वेळी रजनीश सेठ हे मुंबईचे कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे सहपोलिस आयुक्त होते. रजनीश सेठ हे फोर्स वन महाराष्ट्राचे प्रमुख राहिलेले आहेत. गृह विभागाचे प्रधान सचिव म्हणूनही सेठ यांनी जबाबदारी संभाळलेली आहे.
संजय पांडे एप्रिल २०२१पासून राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा प्रभारी कार्यभार सांभाळत होते. राज्याला पूर्णवेळ पोलीस महासंचालक मिळावी ही मागणी अनेक दिवसांपासून होती, अखेर आज रजनीश सेठ यांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईत २६/११ जेव्हा दहशतवादी हल्ला झाला . त्यावेळी एका फोर्स वन पथकाची स्थापना करण्यात आली होती. त्यावेळी सेठ या पथकाचे प्रमुख होते. सेठ यांनी दोन वर्ष मुंबईचे अतिरिक्त पोलिस आयुक्त होते.
राज्याच्या पोलीस महासंचालकाची नियुक्ती करण्याची एक प्रक्रिया असते.
राज्यातील १० वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावं केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे (UPSC) पाठवावी लागतात. युपीएससीकडून त्यातील तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे पोलीस महासंचालक पदासाठी शिफारस करतात. त्यातून पूर्णवेळ महासंचालकचाही नियुक्ती होते. हेमंत नगराळे, के. वेंकटेशम, रजनिश सेठ या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. त्यानंतर रजनीश सेठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.