मुंबई: सध्या राकेश बापट आणि शमिता शेट्टी चर्चेचा विषय बनले आहेत. बिग बॉसमध्ये सहभागी झाल्यापासून दोघांचीही प्रचंड चर्चा होत आहे. आता तर दोघांमध्ये वेगळेच नाते पाहायला मिळत आहे. दोघांमध्येही दिवसेंदिवस जवळीक वाढत आहे. आता यांच्या रोमँटिक केमेस्ट्रीमुळे त्यांच्यावर चर्चा होत असताना पाहायला मिळत आहेत.
राकेश बापट सतत शमिताच्या अवतीभवती फिरत असतो नुकताच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये राकेश बापट शमिता शेट्टीला चक्क किस करताना दिसत आहे. तर कधी तिचे पाय चेपतना दिसत आहे. दोघेही एकमेकांना प्रत्येक गोष्ट शेअर करताना दिसतात. अगदी खाजगी गोष्टींवर देखील चर्चा करत असतात या दोघांमुळे नेहमीप्रमाणे यंदाही बिग बॉसच्या घरात प्रेमाचे वारे वाहणार असंच दिसतंय. दोघेही शोमध्ये हे सध्या एकमेकांचा आधार बनत खेळी खेळत असल्याचे पाहायला मिळत आहे.
राकेशच्या खासगी आयुष्यावर बोलायचे झाले तर त्याचे लग्न टीव्ही अभिनेत्री रिद्धी डोंगरा सोबत झाले होते दोघांची ओळख 2010 मध्ये मर्यादा मालिकेच्या सेटवर झाली होती तिथूनच दोघांच्या प्रेमाला सुरुवात झाली होती. दोघांच्या मैत्रीचे रुपांतर कधी प्रेमात झाले त्यांनाही कळाले नाही. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला होता. 2011 मध्ये त्यांनी लग्न केले दोघांमध्ये खूप चांगली केमिस्ट्री होती. पण लग्नाच्या आठ वर्षांतच दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
2019 साली दोघेही घटस्फोट घेत वेगळे झाले होते. या घटस्फोटामुळे राकेश खचून गेला होता. त्याला प्रचंड मोठा धक्काच बसला होता. तो त्याच्या घटस्फोटाविषयी बोलताना दिसला. त्यावेळी त्याचे दुःख ऐकून शमितानेही त्याला मिठी मारली राकेश बापटचे फिल्मी करिअर पाहिजे तसे यशस्वी ठरले नाही ‘तुम बिन’, ‘दील विल प्यार व्यार’, ‘नाम गुम जायेगा’, ‘गिप्पी’ या हिंदी सिनेमासोबतच ‘वृंदावन’, ‘सविता दामोदर परांजपे’ मराठी सिनेमातही तो झळकला आहे. आता बिग बॉस मध्ये सहभागी झाल्यापासून पुन्हा तो प्रकाशझोतात आला आहे. आता आगामी काळात शोमध्ये राकेश बापट आणि शमिता शेट्टी दोघांमध्ये केमेस्ट्री कशी फुलत जाते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे