मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आणि प्रसिद्ध मॉडेल राखी सावंतच्या ((Rakhi Sawant)आईचे (राखी सावंत आई) निधन झाले. राखी सावंतच्या आईने जुहू येथील क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. राखी सावंतची आई जया भेडा गेल्या तीन वर्षांपासून कर्करोगाशी झुंज देत होत्या. मात्र अखेर त्यांचा लढा अयशस्वी ठरला. या महिन्याच्या सुरुवातीला डॉक्टरांनी राखीच्या आईला सांगितले की त्यांना ब्रेन ट्यूमर (brain tumor)आहे.
आईच्या निधनामुळे राखीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे. राखी सावंतने स्वतः आईच्या निधनाची माहिती दिली. राखी म्हणाली, आई आता या जगात नाही. अनेक अवयव निकामी झाल्याने आईचे निधन झाले. आईची प्रकृती अत्यंत नाजूक होती. मृत्यूसमयी राखी तिच्या आईसोबत होती.
राखी सावंतने जानेवारी महिन्यात तिच्या आईला ब्रेन ट्युमर झाल्याची माहिती दिली होती. राखीने आईसाठी प्रार्थना करण्याचे आवाहनही केले. 2021 मध्ये राखीच्या आईचे कॅन्सरचे ऑपरेशन झाले होते. उपचारासाठी सलमान आणि सोहेल खान यांनी मदत केली. आईची तब्येत लवकरात लवकर बरी व्हावी म्हणून राखी रात्रंदिवस देवाकडे प्रार्थना करत होती.तिने मुंबईतील एका एनजीओलाही भेट दिली.