नागपूर : नागपुरातील(Nagpur) रामन विज्ञान केंद्रात (Raman Science Centre)अनेक ठिकाणी स्फोटके ठेवण्यात आली असून त्याचा स्फोट(explosion) होणार आहे अशा पद्धतीचा ई-मेल केंद्राला मिळाल्याने केंद्रातील अधिकारी आणि पोलिसांची तारांबळ उडालेली असून या संदर्भात केंद्राची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
या प्रकरणी गणेशपेठ(Ganeshpeth) पोलिसात मेल पाठविणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू केला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून बॉम्ब शोधनाशक पथकाने (Bomb detection squad)संपूर्ण केंद्राची कसून तपासणी केली मात्र कुठलीही वस्तू आढळून आलेली नाही. या संदर्भात केंद्रात सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली असून चोवीस तास पोलिसांची फिक्स पॉईंट(Fixed points) लावण्यात आले आहे.