होळी, धूलिवंदन, रंगपंचमी मध्ये नेमका काय फरक असतो?

होळीच्या(Holi) दिवशी होळी पेटवून तिची पूजा करून पेटवली जाते. यादिवशी होळीला अनेक ठिकाणी खास पुरण पोळीचा नैवेद्य दाखवला जातो. होळी (Holi)रचण्याची धामधूम 3 ते 4 दिवस आधीच सुरु असते.

धूलिवंदन म्हणजे होळीच्या दुसऱ्या दिवशी साजरी केली जाणारी होळीची कर. या दिवशी होळी जाळून उरलेली राख एकमेकांवर उधळली जाते, यामुळे याला धुलिवंदन असं म्हणतात.

रंगपंचमी (Rang Panchami)म्हणजे होळी नंतर पाचव्या दिवशी साजरा केला जाणारा सण आहे. यादिवशी सामाजिक सलोखा जपत एकमेकांवर विविध रंगांची उधळण केली जाते. सर्वत्र कोरडे रंग, ओले रंग आणि पाणी देखील खेळले जाते. या दिवशी होळीच्या सणाची सांगता होते.

Social Media