आठवड्याभरात २२ हजार ८७२ पर्यटकांनी दिली राणी बागला भेट

मुंबई : कोरोनामुळे १० महिन्यांपासून भायखळा (Byculla)येथील राणीच्या बागेचे(Rani Bagh) बंद असलेले दरवाजे पर्यटकांसाठी १५ फेब्रुवारी उघडले आणि आठवडाभरात जवळ जवळ २२ हजार ८७२ पर्यटकांनी हजेरी लावली. त्यामुळे राणीच्या बागेतील प्रशासनाच्या तिजोरीत ९ लाख ७९ हजार ९२० रूपयांचा महसूल जमा झाला.

राणीच्या बागेत प्रवेशासाठी मुलांना २५ रूपये आणि प्रौढांसाठी ५० रूपये असे शुल्क आकारले जाते. आई, वडिल आणि दोन मुले यासाठी १०० रूपयांचे शुल्क आकारले जाते. मुलांना आणि आपल्या कुटुंबियांना राणीच्या बागेची सैर करण्यासाठी मुंबईकर येत असले तरी त्यांना सरकारने ठरवून दिलेल्या नियमांप्रमाणे सैर करता येणार आहे. सामाजिक अंतर, हॅँड सानिटाईज,आणि मास्क लावणे या अटी त्यांना पाळणे भाग असून त्याबाबत त्यांना सुचना दिल्या जात आहेत.

Social Media