वेगाने पसणाऱ्या Delta variantने लोकांची चिंता वाढविली आतापर्यंत ८५ देशांमध्ये आढळल्याची डब्ल्यूएचओने दिली माहिती

संयुक्त राष्ट्र : कोरोना विषाणूचा सर्वात संक्रामक व्हेरिएंट डेल्टा आतापर्यंत ८५ देशांमध्ये आढळला आहे. यासंदर्भात जागतिक आरोग्य संस्थेने(WHO) अत्यंत चिंताजनक असल्याचे म्हटले आहे संस्थेच्या मते, जर परिस्थिती अशीच राहिली तर हा सर्वाधिक परिणाम करणारा व्हेरिएंट बनू शकतो. संस्थेद्वारे २२ जून रोजी कोरोना संसर्गाबाबात जारी केलेल्या साप्ताहिक माहितीमध्ये असे म्हटले आहे की, जागतिक पातळीवर अल्फा व्हेरिएंट १७० देशांमध्ये, बीटा ११९ देशांमध्ये, गॅमा ७१ देशात आणि डेल्टा ८५ देशांमध्ये असल्याचे नोंदविण्यात आले आहे.

डेल्टा व्हेरिएंटने लोकांची चिंता वाढविली, आतापर्यंत ८५ देशांमध्ये आढळल्याची नोंद : डब्ल्यूएचओ

Delta variant raises public concern, reported to have been found in 85 countries so far: WHO

संस्थेने जारी केलेल्या माहितीनुसार, डेल्टा व्हेरिएंट आता जागतिक पातळीवर ८५ देशांमध्ये असल्याचे नोंदविण्यात आले आहे. डब्ल्यूएचओ च्या अंतर्गत येणाऱ्या देशांमध्ये याची प्रकरणे समोर येत आहेत. ११ देशांमध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून याची प्रकरणे समोर आली आहेत. सध्या अस्तित्वात असलेल्या ‘व्हेरिएंट ऑफ कन्झर्व’वर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. अल्फा, बीटा, गॅमा आणि डेल्टा व्हेरिएंट सर्व डब्ल्यूएचओ क्षेत्रांत आढळले आहे. डेल्टा व्हेरिएंट अल्फा च्या तुलनेत खूप अधिक संक्रामक आहे, आणि सध्याची परिस्थिती कायम राहिली तर सर्वाधिक प्रभाव टाकणार व्हेरिएंट बनू शकतो.

कोरोनाचा मुलांच्या तुलनेत मुलींवर अधिक प्रभाव : अभ्यास – 

डब्ल्यूएचओ च्या माहितीनुसार, भारतात गेल्या आठवड्यात कोरोनाची सर्वाधिक ४४१,९७६ प्रकरणे समोर आली आहेत. तथापि, ही प्रकरणे मागील आठवड्याच्या तुलनेत ३० टक्क्यांनी कमी आहेत. या दरम्यान कोरोनामुळे सर्वाधिक १६,३२९ लोकांचा मृत्यू देखील भारतात झाला आहे. तथापि यामध्ये ३१ टक्क्यांनी घट झाली आहे.
Rapidly spreading delta variant of Corona raises concern, so far found in 85 countries, WHO gave information.


डेल्टा व्हेरिएंटपासून अमेरिकेला सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता : वैज्ञानिक डॉक्टर फॉसी –

अमेरिकेला Delta variant चा मोठा धोका : वैज्ञानिक डॉक्टर फॉसी

अमेरिकेत झालेल्या संशोधनात कोरोना व्हेरिएंट संदर्भात एक दावा ! –

कोरोना विषाणूचे व्हेरिएंट वेगाने का पसरत आहेत याचा अमेरिकन संशोधनाने केला खुलासा !

Social Media