आरबीआयने पंजाब आणि बँक ऑफ इंडियावर सहा कोटी रुपयांचा दंड ठोठावला….

नवी दिल्ली : रिझर्व्ह बॅँक ऑफ इंडियाने (RBI) बँक ऑफ इंडिया (Bank of India) आणि पंजाब नॅशनल बँकेवर (Punjab National Bank)एकूण ६ कोटी रूपयांचा दंड ठोठावला आहे. या बँकांवर नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड आकारण्यात आला आहे. यापैकी एक उल्लंघन ‘धोकाधडी चे वर्गीकरण आणि त्याची सूचना’ देण्याच्या नियमांसबंधित आहे. बँक ऑफ इंडियावर ४ कोटी रूपयांचा दंड तर पंजाब नॅशनल बँकेवर दोन कोटी रूपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

आरबीआयने एका निवेदनात म्हटले आहे की, बँक ऑफ इंडियाच्या पर्यवेक्षी मूल्यांकनासाठी (एलएसई) वैधानिक तपासणी ३१ मार्च २०१९ रोजी करण्यात आली होती. बँकेने एका खात्यातील घोटाळा शोधून काढण्यासाठी एक आढावा घेतला आणि फसवणूक देखरेख अहवाल (एफएमआर) सादर केला. आरबीआयने एका वेगळ्या निवेदनात म्हटले आहे की, आर्थिक स्थितीच्या संदर्भात पंजाब नॅशनल बँकेची वैधानिक तपासणी करण्यात आली

केंद्रीय बँकेने सांगितले की, जोखीम मूल्यांकन अहवालाच्या तपासणीद्वारे असे दिसून आले आहे की या प्रकरणांमध्ये नियमांचे पालन करण्यात आलेले नाही. दोन्ही घटनांमध्ये सरकारी बँकांना कारणे दाखवा अशी नोटीस पाठविण्यात आली होती. त्यांना विचारण्यात आले होते की सूचनांचे पालन न करूनही त्यांच्यावर दंड का आकारला जाऊ नये. आरबीआयचे म्हणणे आहे की, नियमांचे पालन न केल्यामुळे दोन्ही बँकांवर दंड आकारण्यात आला आहे.

आयसीआयसीआय बँकेवर दंड (ICICI Bank fined)- यापूर्वी आरबीआयने आयसीआयसीआय बँकेवर दंड ठोठावला होता. यामध्ये आयसीआयसीआय बँकेवर देखील नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप होता. आरबीआयने बँकेवर दंड आकारण्यापूर्वी नोटीस जारी केली होती.
RBI fined 6 crores on PNB and BOI, These banks have been fined for violating norms.


सोन्याच्या भावात तेजी, तर चांदी झाली स्वस्त –

सोन्याच्या वायदा भावात जोरदार तेजी, तर चांदी झाली स्वस्त…..

Social Media