कोरोना काळात घरबसल्या पाहा डिजिटल नाटक..”रिकनेक्टिंग”

मुंबई : कोरोना काळात सर्व काही ठप्प झाले, परंतु कलाकाराच्या मनाला कुठे लगाम असतो. असेच काहीसे झाले आकाश शिर्के यांचे जोगिया, साठिस्वप्न अश्या सुंदर एकांकिका केल्यावर कोरोना समोरही थांबायचं नाही म्हणत त्यांनी कॅनव्हास थेटरसच्या मदतीने नवे कोरे 45 मिनिटांचे हिंदी नाटक “रिकनेक्टिंग” मायबाप रसिकांसमोर आणले आहे.Digital Drama Reconnecting

नाटका बद्दल बोलताना लेखक दिग्दर्शक आकाश शिर्के म्हणाले, “नाटक लिहिताना माझ्या डोक्यात इतकंच होतं की नाटकाची जी कथा असेल ती आताच्या परिस्थितीला धरुनच असली पाहिजे तरच “रिकनेक्टिंग” नाटक जास्तं लोकांना आवडेल. ह्या निमित्ताने खऱ्या अर्थाने नाटकाचा एक वेगळा प्रयोग करता आला आणि तो प्रयोग लोकांपर्यंत पोहोचावा इतकीच माफक इच्छा आहे. Digital Drama Reconnecting

टाळेबंदी मध्ये नाटक करण्याची इच्छा खूप होती पण सगळं बंद असल्यामुळे ते कसं शक्य होईल हे मात्र सुचत नव्हतं. मग लक्षात आलं की आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे तर मग त्याचा वापर करून एक डिजिटल नाटक करूया. फक्त सादरीकरण ही नाही तर स्क्रिप्ट, अभिनय सगळ्याच गोष्टी डिजिटल माध्यमातूनच प्रेक्षकांकडे पोहोचणार आहे. डिजिटल नाटक ही कल्पना जेवढी नवीन आहे तेवढीच अवघड सुद्धा. सुरुवातीला थोडा त्रास झाला पण हळू हळू सवय झाली ऑनलाईन तालीम करण्याची. असे मत या नाटकात काम करणाऱ्या अंजली काबरा हिने मांडले.Digital drama Reconnecting

नात्यांच्या नाजुक विषयावरची एक सुंदर कथा पाहायला नक्की या आणि हे “रिकनेक्टिंग” पाहताना मास्क घालावा लागणार नाही कारण हे नाटक तुम्ही घर बसल्या झूम वर पाहू शकता उद्या 22 नोव्हेंबर 2020 रोजी, रात्री 8 वाजता लगेच आपल्या तिकीट मिळवण्यासाठी 9004976727(आकाश शिर्के) अथवा 9082135413 (चेतन) या नंबर वर संपर्क साधा.

Social Media