पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किंमतींपासून लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता; ओपेकचा मोठा निर्णय!

नवी दिल्ली : ओपेक ( OPEC)आणि सहयोगी देशांनी त्या पाच राष्ट्रांमध्ये कच्च्या तेलाचे उत्पादन(crude oil production) वाढविण्यावर सहमती दर्शविली आहे, ज्यांच्यावर या संबंधी बंदी घालण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी यूएईने उत्पादन वाढण्याची मागणी केली होती, त्यानंतर पेट्रोलियम निर्यात करणाऱ्या देशाच्या संघटनेत वाद निर्माण झाला होता. त्यानंतर संघटनेची होणारी बैठक तहकूब करण्यात आली. रविवारी एका निवेदनात म्हटले होते की, इराक, कुवैत, रशिया, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरात (यूएई) हे देश त्यांचे उत्पादन वाढवतील.

या संबंधी सौदी अरेबियाचे ऊर्जामंत्री प्रिन्स अब्दुलाजीज बिन सलमान यांनी सांगितले की, जी गोष्ट आपल्याला एका व्यासपीठावर आणते ती माध्यमांच्या कल्पनेपलीकडील आहे. आमचे विचार बर्‍याच मुद्यांवर भिन्न असू शकतात, परंतु तरीही आम्ही एक आहोत. त्यांच्यात एकमत कसे झाले याबाबात सविस्तर सांगण्यास मात्र त्यांनी नकार दिला. कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये सतत होणाऱ्या वाढीमुळे भारत ओपेक देशांकडे उत्पादन वाढवण्याची मागणी करत आहे.

एसबीआयने केवायसी फसवणूकीसंदर्भात ग्राहकांना दिला इशारा! –

ऑनलाइन बैठकीनंतर संयुक्त अरब अमिरातचे ऊर्जामंत्री सुहेल-अल-मजरूई यांनी पत्रकारांना (पूर्ण संमती) याबद्दल माहिती दिली. तथापि, त्यांनी तातडीने काहीच सांगितले नाही. त्यानंतर ओपेक च्या निवेदनात पाच देशांच्या उत्पादन पातळीत वाढ करण्याच्या कराराबाबत माहिती देण्यात आली.

भारताची ग्राहक डिजिटल अर्थव्यवस्था २०३०पर्यंत ८०० अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज – 

या महिन्याच्या सुरुवातीस उत्पादनासंदर्भातील चर्चा खंडित झाली होती, कारण युएईला स्वतःची उत्पादन पातळी वाढवायची होती. त्यामुळे यूएई आणि सौदी अरेबियामध्ये तणाव वाढला होता. अल मजरूई यांनी सांगितले की, ‘युएई या संघटनेप्रति वचनबद्ध आहे आणि कायम त्यांच्यासोबत कार्य करेल. त्यांनी असेही सांगितले की, आम्ही बाजार समतोल आणि सर्वांना मदत करण्यासाठी चांगला प्रयत्न करू.’
Relief possible from rising prices of petrol, diesel, OPEC took a big decision. OPEC (OPEC) and allied countries have agreed to increase crude oil production in the five nations that were banned in this regard. A few days ago, the UAE had demanded an increase in production, following a controversy in the organization of the petroleum exporting country. The meeting of the organization was then adjourned. A statement on Sunday said that Iraq, Kuwait, Russia, Saudi Arabia and the United Arab Emirates (UAE) will increase their production.


मास्टरकार्डच्या बंदीमुळे एसबीआय, ऍक्सिससह पाच बँका होणार प्रभावित! –

मास्टरकार्डच्या बंदीमुळे एसबीआय, ऍक्सिससह पाच बँका होणार प्रभावित!

 

RBIची मास्टरकार्ड कंपनीवर मोठी कारवाई; नवीन क्रेडिट, डेबिट, प्रीपेड कार्ड ग्राहक बनविण्यावर बंदी! –

RBIची मास्टरकार्ड कंपनीवर मोठी कारवाई; नवीन क्रेडिट, डेबिट, प्रीपेड कार्ड ग्राहक बनविण्यावर बंदी!

Social Media