माहूरच्या रेणुका मातेच्या नवरात्र उत्सवाला सुरूवात

नांदेड : साडेतीन शक्तिपीठांपैकी मूळ पीठ असलेल्या नांदेड(Nanded) जिल्ह्यातील माहूरच्या श्री रेणुका मातेच्या शारदीय नवरात्र (Shardiya Navratri)उत्सवास आज घटस्थापनेने प्रारंभ झाला आहे. माहूर(Mahur) गडावर प्रशासन आणि मंदिर संस्थानच्या वतीने उत्सवाची तयारी करण्यात आली असून मंदिरला फुलांनी सजविण्यात आले आहे.

आज सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचे चित्र आहे. अत्यंत रमणीय आणि निसर्गरम्य तसेच डोंगर आणि जंगलांनी व्यापलेल्या माहूर गडावर रेणुका माता विराजमान असून महाराष्ट्र(Maharashtra), तेलंगणा(Telangana), आंध्रप्रदेश(Andhra Pradesh), कर्नाटक(Karnataka), मध्यप्रदेश(Madhya Pradesh) सह देशभरातून भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. श्री रेणुकामातेच्या नवरात्र उत्सवास घटस्थापनेपासून प्रारंभ होतो. घटस्थापने पूर्वी श्री रेणुका देवीचे मंदिर फुलांनी सजविण्यात आले होते. सकाळी साडेअकरा वाजता श्री रेणुका देवी(Renuka Devi) संस्थानचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश नागेश न्हावकर यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली.

 

Social Media