अलिबाग : रायगड(Raigad) जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात अंगारकी चतुर्थीचे (Angarki Chaturthi)औचित्य साधून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) व त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते दिवेआगर येथील सुवर्ण गणेश मुर्तीच्या मुखवट्याची पुनर्स्थापना करण्यात आली .
दिवेआगर येथील मंदीरातील गणेशाची सुवर्णमुर्ती ही पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू होते , काही वर्षांपूर्वी ती चोरट्यांनी चोरली होती. तेव्हापासून दिवेआगर येथील महत्व काहीसं कमी झाल्याचे दिसून येत होते.
दिवेआगर येथील सुवर्ण गणेश मुर्तीच्या मुखवट्याची पुनर्स्थापना केली असून त्याच्या संरक्षणासाठी आधुनिक यंत्रणा बसविण्यात आली आहे. त्यामुळे जर कोणी सुवर्णगणेश मुर्तीच्या मुखवट्याची चोरी करायचा प्रयत्न केल्यास याठिकाणी असलेल्या आधुनिक यंत्रणा कार्यरत होतात. त्यामुळे कर्कश आवाजाद्वारे नागरिकांना वेळीच कल्पना मिळते व सर्व सतर्क होतात. त्यामुळे सुवर्ण गणेश मुर्तीच्या मुखवट्याची चोरी होणार नाही याची प्रशासना द्वारे पुरेपूर दक्षता घेण्यात आली आहे.
गेल्या दोन वर्षांतील कोरोना महाभयंकर महारीने पर्यटक स्थळ बंद केल्याने येथील स्थानिकांचा आर्थिक स्त्रोत खंडित झाला होता. आता शासनाने परिस्थितीचा अंदाज घेऊन कोरोना स्थिती देखील नियंत्रणात आल्याने सर्व पर्यटक स्थळे शासनाने काही निर्बंध लाऊन चालू केली असल्याने येथील नागरिकांच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत.
यावेळी दिवेआगर येथील दोन कोटी ची नळ पाणी योजनेचा शुभारंभ व दिवेआगर पोलीस चौकीचे उद्घाटन यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
On the occasion of Angarki Chaturthi in Srivardhan taluka of Raigad district, the mask of Golden Ganesh Murti at Diveagar was restored by Maharashtra Deputy Chief Minister Ajit Pawar and his wife Sunetra Pawar.