दिपिका-दिशाला मागे सोडून रिया चक्रवर्ती मोस्ट डिझायरेबल वुमनच्या यादीत अव्वल स्थानी!

मुंबई : अभिनेता सुशांत सिग राजपूतच्या निधनानंतर अभिनेत्री रिया चक्रवर्ती खूपच चर्चेत आली होती. ती स्पॉटलाइट मध्ये कायम होती. आता रिया चक्रवर्तीने (riya chakravarti) द टाइम्स ५० मोस्ट डिझायरेबल वुमन २०२० मध्ये (Miss Diva Supranational 2020) अव्वल स्थान मिळविले आहे. या यादीत प्रत्येक क्षेत्रातील महिलांना समाविष्ट केले आहे. या यादीत त्या महिलांना समाविष्ट केले आहे ज्यांनी गेल्या वर्षांत आपली छाप सोडली आहे आणि मने जिंकली आहेत.

रियाने दीपिका पादुकोण, दिशा पटानी (deepika padukone and disha patani) आणि कटरिना कैफ यांसारख्या अभिनेत्रींना देखील मागे सोडले आहे. मागील वर्षी रिया चक्रवर्ती खूपच चर्चेत आली होती. तसेच, नकारात्मक गोष्टींबद्दल ती अधिक चर्चेत आली होती. सुशांतच्या कुटुंबियांनी रियावर अनेक गंभीर आरोप केले होते. रिया ड्रग्स प्रकरणात देखील तुरूंगात गेली होती. सध्या ती जामिनावर बाहेर आहे.

मोस्ट डिझायरेबल वुमन २०२० च्या यादीत पहिल्या दहामध्ये (टॉप) मिस युनिव्हर्स २०२०ची तिसरी रनरअप एडलिन कॅस्टेलिनो दुसऱ्या क्रमांकावर आहे. दिशा पटानी तिसऱ्या क्रमांकावर असून कियारा अडवाणी चौथ्या तर दीपिका पादुकोण पाचव्या क्रमांकावर आहे आणि कैटरिना कैफ सहाव्या, जॅकलिन फर्नांडिस सातव्या, अनुप्रिया गोयंका आठव्या, रूही सिंग नौव्या आणि आवृत्ती चौधरी दहाव्या क्रमांकावर आहे.

Riya Chakraborty tops the list of Most Desirable Women, leaving Deepika-Disha behind.


जूनमध्ये ऑनलाइनच्या माध्यमातून होणार ‘हे’ चित्रपट प्रदर्शित –

फरहान अख्तरचा ‘तूफान’, विद्या बालनचा ‘शेरनी’ असे अनेक चित्रपट जूनमध्ये OTT वर होणार प्रदर्शित!

Social Media