मुंबई : बहुचर्चित सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकऱणात अभिनेत्री रिया चक्रवर्ती ची जाणीवपूर्वक बदनामी केली जात असल्याचा आरोप रियाने केला आहे. बदनामी करणारे माध्यमे आणि डिंपल थावणीला रिया आता कोर्टात खेचणार असल्याचे रियाचे वकिल सतीश मानेशिंदे यांनी सांगितले. चक्रवर्तीला एनसीबीने जामिनावर मुक्तता केली. रियाला एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. ती आता जामिनावर बाहेर आहे.
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा वाद दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. या प्रकरणात काही माध्यमांनी जाणीवपूर्वक मुंबई पोलिसांची बदनामी केल्याचा आरोप होत असताना आता यात रिया चक्रवर्तीनेही उडी घेतली आहे. काही माध्यमांनी रियाची जाणीवर पूर्वक बदनामी केल्याचा आरोप रियाने केला आहे, तर माध्यमांना चुकीची माहीती देत बदनामी करणाऱ्या डिंपल थावणी विरोधात रियाने सीबीआयसह न्यायालयात धाव घेतली आहे. डिंपलने माध्यमांना जे स्टेटमेंट दिले होते. तिने सीबीआयला देण्यात आलेल्या जबाबात तिने स्वतःच स्टेटमेंट बदललं असा आरोप रियाने केला. त्यामुळे डिंपलने जाणीव पूर्वक बदनामी केल्याचा आरोप रियाने केल्याचे रियाचे वकिल सतीश मानेशिंदे यांनी सांगितले.
या विरोधात रियाने सीबीआयचे एसपी नूपूर प्रसाद यांच्याकडे डिंपल थावणी विरोधात लेखी तक्रार दिली आहे, तर दुसरीकडे या प्रकरणात मुंबई पोलिसांची बदनामी करण्यासाठी तब्बल १ लाख बनावट अकाऊन्टचा वापर करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त परमबिर सिंग यांनी दिली आहे. यात प्रामुख्याने ५ ते ७ बाँट अँप्लिकेशनचा वापर करण्यात आला आहे. या अँप्लिकेशनच्या मदतीने एकावेळी ५ ते १० हजार अकाऊन्ट कंट्रोल केली जाऊ शकतात, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.