‘रुही’ चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर जाहीर  

मुंबई : 11 मार्चला जाह्नवी कपूर(Jahnavi Kapoor) आणि राजकुमार राव (Rajkumar Rao)यांचा ‘रूही’ (Ruhi)हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होत आहे. डेब्यू फिल्म धडक नंतर चित्रपटगृहात प्रदर्शित होणारा जाह्नवीचा हा दुसरा चित्रपट आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर्स रिलीज करण्यात आला आहे. ज्यात जान्हवीचा भुताचा लूक समोर आला आहे.

पोस्टरमध्ये जान्हवीचा भयानक चेहरा दाखविण्यात आला आहे, तर राजकुमार राव आणि वरुण शर्मा यांना नवरदेव म्हणून दाखवण्यात आले आहे. जाह्नवीने इंस्टाग्रामवर हे पोस्टर शेअर केले आहे. जाह्नवीने  लिहिले आहे – तुम्ही या भूतिया विवाहात नक्कीच या. जाह्नवीच्या या पोस्टवर तिचा चुलत भाऊ हर्षवर्धन कपूरने लिहिले आहे – तु खूप भयानक दिसत आहेस. रुही हा एक हॉरर-कॉमेडी चित्रपट आहे, हार्दिक मेहता दिग्दर्शित. यापूर्वी मोशन पोस्टरद्वारे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली होती.

याची निर्मिती स्त्री चित्रपटाचे निर्माता दिनेश विजान यांनी केली आहे, तर मृगदीप लांबा सहकारी निर्माता आहेत. स्त्री मध्ये राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत होते. रुही ही स्त्री पासून सुरु झालेल्या भयपट-विनोदी मालिकेचा सिक्वल आहे. रुही अफजा नावाच्या या चित्रपटाची घोषणा निर्मात्यांनी 2019 मध्येच केली होती.

रुही मागील वर्षी प्रदर्शित होणार होता, पण पॅनडेमिकमुळे चित्रपटगृहे बंद राहिली आणि चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलले गेले. थिएटरमध्ये येणारा जाह्नवीचा हा दुसरा चित्रपट आहे. यापूर्वी गुंजन सक्सेना – कारगिल गर्ल थिएटरमध्ये आली होती, पण थिएटर्स बंद झाल्यानंतर नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली.

राजकुमार राव आणि जाह्नवी कपूर व्यतिरिक्त रुहीमध्ये वरुण शर्मा, पंकज त्रिपाठी, अ‍ॅलेक्स ओनेल, सीमा पाहवा, आमना शरीफ आणि रोनित रॉय दिसणार आहेत. 2018 मध्ये धडक मधून बॉलिवूमधील पदार्पणानंतर जाह्नवी कपूर मोठ्या पडद्यावर परतली आहे. जाह्नवीचा मागील चित्रपट ‘गुंजन सक्सेना – द कारगिल गर्ल’ (Gunjan Saxena – The Cargill Girl)मागील वर्षी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. याशिवाय जाह्नवी नेटफ्लिक्सच्या अँथॉलॉजी फिल्म घोस्ट स्टोरीजमध्येही दिसली होती.

 

‘एमएस धोनी’ मध्ये सुशांतसिंहच्या मित्राची भूमिका साकारणाऱ्या संदीप नाहरची आत्महत्या

 

Social Media