Russia-Ukraine War: स्वरा भास्कर ते सोनू सूद;  रशिया-युक्रेन युद्धावर काय म्हणाले  सेलिब्रिटी

मुंबई :  युक्रेन (Ukraine) आणि रशिया (Russia) यांच्यातील युद्धाची स्थिती अधिकच बिकट होत चालली आहे. युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी सांगितले की, रशियन हल्ल्यात आतापर्यंत 10 लष्करी अधिकाऱ्यांसह 137 नागरिकांचा मृत्यू झाला आहे आणि 316 जण जखमी झाले आहेत. या बॉलीवूड सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर आपल्या पोस्ट शेअर करून या सर्व युद्ध परिस्थितीवर आपले मत व्यक्त केले आहे. त्यांच्या पोस्टद्वारे पाहा   काय  म्हणाले बॉलीवूड सेलिब्रिटी

सोनू सूद (Sonu Sood)

सोनू सूदने (Sonu Sood)ट्विट करून भारतीय दूतावासाला आवाहन केले आहे. त्याने ट्विट केले, “18000 भारतीय विद्यार्थी आणि अनेक कुटुंबे युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. मला खात्री आहे की सरकार त्यांना परत आणण्याचा प्रयत्न करेल. मी भारतीय दूतावासाला त्यांच्यासाठी पर्यायी मार्ग शोधण्याची विनंती करतो. मी त्यांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करतो..’

स्वरा भास्कर(Swara Bhaskar)

अभिनेत्री स्वरा भास्करनेही ट्विट केले आहे. तिने लिहिले आहे की, “जागतिक राजकारण आता फराज आरिफ अन्सारीच्या चित्रपटासारखे वाटते.’

श्रुती सेठ(Shruti Seth)

“प्रत्येकजण युद्धात हरतो,” अभिनेत्रीने ट्विट केले.

Social Media