कोरोना काळात मंदीवर मात करण्यासाठी रशिया, अमेरिका देत आहे ‘वॅक्सीन टूरिझम’ची ऑफर!

मुंबई: पूर्व आफ्रिकी देश सेशेल्सने (Seychelles) पर्यटनासाठी पुन्हा आपल्या सीमा उघडल्या आहेत आणि हवाई यात्रेलाही परवानगी दिली आहे. वास्तविक, सेशेल्स जगातील पहिला देश आहे जेथे सर्वाधिक लोकांना कोरोना लस देण्यात आली आहे. हिंद महासागर द्वीपसमूहातील या सुंदर देशाची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे. हेच कारण आहे की, कोरोनामुळे पर्यटनात सतत येणाऱ्या घसरणीमुळे देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे प्रभावित झाली आहे. वित्तीय घाटा यावर्षी जीडीपीच्या 15.3 टक्क्यांपर्यंत खाली येण्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर देशाचे कर्ज त्याच्या जीडीपीच्या सुमारे 100 टक्के इतके आहे. त्यामुळे आता सेशेल्स ने ‘वॅक्सीन टूरिझम’च्या(Vaccine Tourism) दिशेने देखील आपले पाऊल उचलले आहे.

अमेरिकेने ५५० मिलियनपेक्षा अधिक लसींची मागणी केली आहे – 

‘वॅक्सीन पर्यटन’(Vaccine Tourism) गेल्या वर्षापासून ट्रेंडमध्ये आले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये, मागील वर्षी बर्‍याच सहल मार्गदर्शकांनी अमेरिकी यात्रेसाठी या ट्रेंडची सुरूवात केली होती. या पॅकेजमध्ये वॅक्सीन च्या दोन डोससह अमेरिकेत प्रवास करण्याव्यतिरिक्त इतर फायदे देखील देण्याचा प्रस्ताव दिला होता. जगभरात ही पर्यटन यात्रेची एक नवीन आवृत्ती म्हणून उदयास आली आहे, ज्यामध्ये पर्यटकांना लसीचे डोस आणि इतर फायदे देखील दिले जातात.

कोरोना काळानंतर आता यूरोपमधील अनेक पर्यटन संस्था अमेरिका, ब्रिटन, रशिया आणि मालदीव यासारख्या देशांमध्ये ‘वॅक्सीन टूरिझम’चे पॅकेज देत आहे. अलीकडेच, मध्य युरोपमधील लहान देश असलेल्या सॅन मारिनोने गेल्या आठवड्यात पहिल्या वॅक्सीन पर्यटक गटाचे स्वागत केले आहे. वॅक्सीन पासपोर्ट आणि ‘वॅक्सीन टूरिझम’सह अमेरिका आणि रशिया देखील आता या ट्रेंडला प्रोत्साहन देत आहे. रशिया आणि मालदीव गेल्या वर्षापासून अशा टूरिझम पॅकेजवर काम करीत आहेत, जे विदेशात यात्रा करण्यादरम्यान लसीकरणाची सुविधा देत आहेत. अमेरिकेतही याचा कल आता वाढत आहे.
After Corona, many European tour companies are now offering vaccine Turism in countries like USA, UK, Russia and Maldives.


राजगीर शहरातील नेचर सफारी हा पर्यटनासाठी उत्तम पर्याय! –

निसर्गाने रोमांचित असलेले राजगीर शहर पर्यटनासाठी सर्वोत्कृष्ट!

Social Media