नवी दिल्ली : क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar)फरहान अख्तरच्या(Farhan Akhtar) ‘तूफान’ (‘Toofan)चित्रपटचा छोटासा आढावा घेतला आहे. सचिनने हा रिव्यू त्याच्या इंस्टा स्टोरी मध्ये पोस्ट केला आहे. सचिनने चित्रपटातील कलाकारांचे कौतुक देखील केले आहे आणि हे प्रेरणादायी असल्याचे देखील म्हटले आहे.
सचिनने लिहिले आहे की, ‘परेश रावल, फरहान अख्तर, मृणाल ठाकुर आणि सर्व कलाकारांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. चित्रपट पाहून मजा आली. चित्रपट असे दर्शवते की आपल्या उर्जेला योग्य दिशा दिल्याने किती महान गोष्टी केल्या जाऊ शकतात. हे पात्र साकारण्यासाठी फरहान ने जी मेहनत केली आहे, ती दिसून येत आहे.’ तूफान चित्रपट १६ जुलै रोजी ऍमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाला असून या स्पोर्ट्स चित्रपटाचे दिग्दर्शन राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी केले आहे.
‘तुफान’ चित्रपटाची कथा मुंबईच्या डोंगरी भागात राहणाऱ्या गुंड अज्जू भाई उर्फ अजीज अली याच्या जीवनावर आधारित आहे, ज्याला सन्मान मिळवण्यासाठी बॉक्सर बनण्याची इच्छा आहे. परेश रावल यांनी बॉक्सिंग कोचची भूमिका साकारली आहे. तर, मृणाल ठाकूरने परेश रावल यांची मुलगी आणि फरहानची प्रेमिका आणि पत्नीची भूमिका साकारली आहे. चित्रपटाला मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे फरहान अख्तर देखील खुष आहे. त्याने सर्वांचे आभार मानले आहेत.
Sachin Tendulkar did the review of ‘Toofan’, said this about the character of Farhan Akhtar. Sachin Tendulkar, known as the God of Cricket, has given a short review of Farhan Akhtar’s ‘Storm’. Sachin posted this review in his Insta Story. Sachin has also praised the cast of the film and said it is inspiring.
भूषण कुमारविरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल! –
मॅनेजिंग डायरेक्टर भूषण कुमारविरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल!