शिराळच्या सोनाली नवांगुळ यांना साहित्य अकादमीचा अनुवादासाठीचा पुरस्कार जाहीर….

मुंबई : साहित्य अकादमीचे आज अनुवाद पुरस्कार जाहीर करण्यात आले. मराठी भाषेत हा पुरस्कार कोल्हापूरच्या सोनाली नवांगुळ यांनी केलेल्या ‘मध्यरात्री नंतरचे तास’ या अनुवादित कादंबरीला जाहीर करण्यात आला असून, सलमा यांच्या मूळ तमिळ भाषेतील कादंबरीचा हा अनुवाद आहे.

त्यांच्या जाँयस्टिक या ग्रंथाला दमसा सभेचा पुरस्कार यापूर्वी मिळालेला आहे. (Sahitya Akademi Award for Translation to Sonali Nawangul) सोनालींनी यापूर्वी अनेक पुस्तकांचे भाषांतर केलं असून त्या स्वतंत्र लिखाण ही करतात. स्मृतिचिन्ह, ५० हजार रुपये रोख व मानपत्र अशा स्वरूपात हा पुरस्कार दिला जातो. तर जयश्री शानभाग यांनी कोकणीत अनुवादित केलेल्या ‘स्वप्न सारस्वत’ कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे.

Social Media