सलमान खानने झुरळही मारले नाहीतर माफीही मागणार नाही…लॉरेन्स बिश्नोईला सलिम खान यांनी दिले सडेतोड उत्तर!

मुंबई :   अभिनेता  सलमानने माफी मागावी. परंतु सलमान खानने(Salman Khan) गुन्हाच केला नाही, त्यामुळे तो माफी मागणार नाही. त्याने माफी मागितली तर त्याचा अर्थ होईल, त्याने गुन्हा केला आहे, असे वक्तव्य करत सलमानचे वडिल लेखक  सलीम खान(Salim Khan) यांनी माफीला इन्कार केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी(Baba Siddiqui) यांची काही दिवसांपूर्वी हत्या झाली. या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई(Lawrence Bishnoi) गँगने घेतली. अभिनेता सलमान खानला मदत केल्यामुळे बाबा सिद्दिकी यांची हत्या केल्याचा दावा लॉरेन्स बिश्नोई गँगने केला. तसेच जो सलमानची मदत करणार त्यांच्याबाबत असाच प्रकार होणार असल्याची धमकी दिली. सलमान खान याने माफी मागवी, अशी मागणी लॉरेन्स बिश्नोई गँग आणि बिश्नोई समाजाकडून होत आहे. परंतु सलमान माफी मागणार नाही, असे सलमान खान यांचे वडील सलीम खान यांनी म्हटले आहे. सलमानने कधी झुरळही मारले नाही तर तो कळविटची शिकार काय करणार? त्याने शिकारच केली नाही, त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
सलमान खान यांना धमकी मिळत असल्यामुळे त्याची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. तसेच दोन कोटीपेक्षा जास्त रक्कम खर्च करुन सलमान खानने बुलेट प्रुफ गाडी घेतली आहे. सलमानने बुलेट प्रूफ असलेली नवी निसान पेट्रोल एसयूव्ही खरेदी केली आहे. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सलीम खान यांनी म्हटले आहे की, सलमान खान माफी मागणार नाही. त्याने कळविटचा शिकार केली नाही. त्याने कधी झुरळ सुद्धा मारला नाही. आम्ही अहिंसा मानणारे लोक आहेत.
सलीम खान यांनी म्हटले की, लोक आम्हाला म्हणतात तुम्ही नेहमी जमिनीवर पाहतात. तुम्ही विनम्र आहेत. आम्ही त्यांना सांगतो, आम्हाला भीती असते की आमच्या पायाखाली एखादी किडा आला तर…त्याचा विचार आम्ही करतो. मानव म्हणून आम्ही नेहमी लोकांना मदत करतो. कोरोनानंतर मदत कमी झाली. परंतु त्यावेळेस लांब रांगा लागतात. कोणाला शस्त्रक्रिया करण्याची गरज असेल तर त्याला आम्ही मदत करतो. दिवसभरत ४०० पेक्षा जास्त लोकांना आम्ही मदत करत असतो.
Social Media