salman khan birthday : बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खानने शुक्रवारी आपला वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला. या खास प्रसंगी, अंबानी कुटुंबाने गुजरातमधील जामनगरमध्ये एक भव्य पार्टी दिली, जिथे दिवाळी साजरी होत असल्याचा भास झाला. यावेळी दिवाळी साजरी करण्याचा एक भाग म्हणून फटाके फोडण्यात आले. सलमानचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याचे संपूर्ण कुटुंब चार्टर्ड विमानाने जामनगरला पोहोचले. या विमानाचा व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे. सलमान खान शुक्रवारी दुपारी त्याचे कुटुंब आणि जवळच्या मित्रांसह जामनगर विमानतळावर उतरला.
त्याच्यासोबत त्याची आई सलमा खान, हेलन, अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया डिसूझा, निर्माता साजिद नाडियादवाला आणि सलमानची कथित मैत्रीण युलिया वंतूर होती. अलविरा आणि अर्पिता या बहिणीही उपस्थित होत्या. यावेळी त्याच्यासोबत बॉडीगार्ड शेराही दिसला.
एका रांगेत दिसलेला गाड्यांचा ताफा
सोशल मीडियावर दिसलेल्या व्हिडिओमध्ये जामनगरमधील एका रांगेतून कारचा ताफा दिसत आहे, ज्यामध्ये सलमान आणि त्याचे कुटुंबीय उपस्थित आहेत.
सलमान खानच्या 59 वा वाढदिवसानिमित्त 26 डिसेंबरच्या रात्री वाढदिवसाची पार्टी झाली. या पार्टीला बॉलिवूडमधील दिग्गजांनी हजेरी लावली होती. रितेश देशमुख आणि जेनेलिया हे प्रसिद्ध जोडपं देखील या पार्टीत सहभागी झाले होते. अभिनेत्याचा वाढदिवस खूप उत्साहात साजरा झाला. आज सलमानचेही चाहते देखील आनंदी आहेत. सोशल मीडियावर अभिनेत्याला शुभेच्छा देत आहेत.