Salman Khan in Singham Again: सिंघममध्ये होणार दबंग एन्ट्री! ‘सिंघम अगेन’मध्ये दिसणार चुलबुल पांडे?

Salman Khan in Singham Again: रोहित शेट्टी(Rohit Shetty)चा बहुप्रतिक्षित ‘सिंघम अगेन'(Singham Again) यंदाच्या दिवाळीला रिलीज होणार आहे. या चित्रपटात अजय देवगण(Ajay Devgan) सह इतर अनेक स्टारकास्ट दिसणार आहेत. यावरून प्रेक्षक या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक असल्याचे दिसून येते. स्टारकास्टच्या यादीत सलमान खानचेही नाव जोडले गेल्याचे सांगितले जात आहे.

‘सिंघम अगेन'(Singham Again) मध्ये सलमान खान( Salman Khan) ‘चुलबुल पांडे’च्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे आता सिंघममध्ये दबंगच्या एन्ट्रीची चर्चा सुरू झाली आहे. आता या चित्रपटात सलमान खान काय ट्विस्ट आणणार हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

‘सिंघम अगेन'(Singham Again) मध्ये सलमान खानची एन्ट्री

हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, अजय देवगणच्या आगामी ‘सिंघम अगेन’ या चित्रपटात सलमान खानचा कॅमिओ असू शकतो. त्या कॅमिओमध्ये सलमान ‘चुलबुल पांडे’ची भूमिका साकारणार आहे आणि ‘सिंघम’ला सपोर्ट करणार आहे. परंतु, निर्मात्यांनी अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही.

काही दिवसांपूर्वी रोहित शेट्टीने एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्याच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, ‘सिंघम या हिरोशिवाय अपूर्ण आहे. या दिवाळीत स्कॉर्पियो येतील आणि फिरतीलही पण एन्ट्री दुसऱ्याचीच असेल. रोहितच्या या व्हिडिओनंतर रोहित सलमान खानच्या एन्ट्रीचे संकेत देत असल्याचे बोलले जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rohit Shetty (@itsrohitshetty)

‘सिंघम अगेन'(Singham Again) ची स्टार कास्ट

या दिवाळीत रिलीज होणाऱ्या ‘सिंघम अगेन’मध्ये अजय देवगण मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय दीपिका पदुकोण(Deepika Padukone), करीना कपूर(Kareena Kapoor), टायगर श्रॉफ(Tiger Shroff) आणि जॅकी श्रॉफ (Jackie Shroff)महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटात अक्षय कुमार इन्स्पेक्टर सूर्यवंशी, रणवीर सिंग इन्स्पेक्टर ‘सिंबा’च्या भूमिकेत दिसणार आहे. आता या यादीत सलमान खानचेही नाव जोडले गेले आहे.

 

Social Media