क्रुझ ड्रग्ज प्रकरणातून समीर वानखेडे यांची उचलबांगडी; तपास एनसीबी दिल्लीच्या संजय सिंह यांच्याकडे

आरोपांचा तपास पूर्ण होण्यापूर्वीच वानखेडेवर कारवाई बाबत आश्चर्य!

मुंबई  : क्रूझ रेव्ह ड्रग्ज पार्टी प्रकरणात गेल्या काही दिवसापासून झालेल्या आरोप- प्रत्यारोपांची दखल घेत एनसीबीच्या वरिष्ठ अधिका-यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. आर्यन खान प्रकरणासहअन्य पाच प्रकरणातील तपास एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे  यांच्याकडून काढून घेण्यात आला आहे. याबाबतची माहिती एनसीबीचे वरीष्ठ अधिकारी मुथा अशोक जैन यांनी दिली आहे. आरोप झाल्यानंतर समीर वानखेडे यांची एनसीबीने खात्यांतर्गत चौकशी सुरू केली आहे. त्यासाठी एसआयटीची स्थापनाही केली आहे. तसेच वानखेडेंच्या जात प्रमाणपत्राचा अहवाल अजून राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने दिला नाही. मात्र, या सर्व गोष्टी अर्धवट असतानाच समीर वानखेडें यांच्याकडून एकूण सहा केसेसचा तपास काढून घेण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

आर्यन खान प्रकरणाची चौकशी संजय सिंग यांच्याकडे(Sanjay Singh probes Aryan Khan case)

क्रूझ ड्रग्ज प्रकरणानंतर समीर वानखेडेंवर सातत्याने राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी क्रुझवरील छापेमारी बोगस असल्याचा आरोप केले होते. वानखेडेंच्या जातीच्या प्रमाणपत्रावरही त्यांनी संशय व्यक्त केला होता. त्यानंतर क्रुझ ड्रग्ज प्रकरणातील पंचानीही धक्कादायक कबुली दिली होती. तर काही पंचाना अटकही करण्यात आली होती. मुंबई एनसीबीकडून शाहरुख खानकडून २५ कोटींची मागणी केल्याचेही समोर आल्याने खळबळ उडाली होती. त्यामुळे आर्यन खान प्रकरणाची चौकशी आता संजय सिंग यांच्याकडे देण्यात आली आहे. उद्यापासूनच संजय सिंग या प्रकरणाची तपास करणार येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

वानखेडेची चौकशी अर्धवट असतानाच कारवाई(Action taken while Wankhede’s inquiry was partial)

आरोप झाल्यानंतर समीर वानखेडे यांची एनसीबीने खात्यांतर्गत चौकशी सुरू केली आहे. त्यासाठी एसआयटीची स्थापनाही केली आहे. तसेच वानखेडेंच्या जात प्रमाणपत्राचा अहवाल अजून राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने दिला नाही. मात्र, या सर्व गोष्टी अर्धवट असतानाच समीर वानखेडें यांच्याकडून एकूण सहा केसेसचा तपास काढून घेण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

हा प्रशासकीय तपास यंत्रणेचा भाग आहे

वानखेडे यांच्याकडून तपास काढून घेण्याबाबत भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी मत व्यक्त केले आहे. आरोप झाले त्या अधिकाऱ्याला बदलायचे यातून वाईट मेसेज जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हा प्रशासकीय तपास यंत्रणेचा भाग आहे. जे आरोप होतायत, त्यासाठीच बदली झाली किंवा त्यांची काही चूक आहे म्हणून बदली झाली, असे मानायचे कारण नाही, मोठ्या प्रमाणावर बिनबुडाचे आरोप झाले. जर तपास यंत्रणेला वाटत असेल की आरोप आहेत तर दुसऱ्या अधिकाऱ्याकडे ती चौकशी द्यावी, तर मला वाटत नाही की दबावाने बदली झाली, असेही प्रवीण दरेकर म्हणाले. ते म्हणाले की, आता तपासच होणार नाही, असे मानण्याचे कारण नाही. ही यंत्रणा आणखी ताकदीने तपास करेल आणि जे काही सत्य आहे ते जनतेसमोर येईल. मोठ्या प्रमाणात आरोप झाल्यानंतर तपास अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात असता कामा नये. म्हणून निर्णय घेतला असेल असे ते म्हणाले.

Social Media