‘एमएस धोनी’ मध्ये सुशांतसिंहच्या मित्राची भूमिका साकारणाऱ्या संदीप नाहरची आत्महत्या

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूतसोबत(Sushant Singh Rajput) ‘एमएस धोनी’ (MS Dhoni)मध्ये काम करणारा अभिनेता संदीप नाहरने आत्महत्या केली आहे. संदीपचा मृतदेह पोलिसांनी त्याच्या मुंबईच्या घरातून ताब्यात घेतला. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. हे पाऊल उचलण्यापूर्वी संदीपने फेसबुकवर एक व्हिडिओ आणि सुसाइड नोट पोस्ट केली होती, ज्यात त्याने त्याच्या विवाहित जीवनातील अडचणींमुळे स्वत:ला संपवण्याविषयी बोलला होता. सुशांतनंतर संदीपचा अशाप्रकारे मृत्यू लोकांसाठी अत्यंत धक्कादायक आहे.Sandeep-Nahar-Sushant-Singh-MS Dhoni-commits-suicide

अभिनेता संदीप नाहर चंदीगडचा रहिवासी आहे. पण तो पदवी शिक्षण पूर्ण करण्यासाठी मुंबईला आला होता. येथे आल्यानंतर त्याने काही चित्रपटांत नशीब आजमावले. संदीप 2016 मध्ये सुशांत सिंग राजपूतच्या चित्रपटात एमएस धोनीमध्ये दिसला होता. या चित्रपटात त्याने सुशांतच्या मित्राची भूमिका साकारली होती.

2019 मध्ये संदीप अक्षय कुमारच्या ‘केसरी'(Kesari) चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात संदीपने ‘भुट्टा सिंग’ ची भूमिका साकारली होती. याखेरीज या अभिनेत्याने वर्ष 2019 मध्येच प्रदर्शित झालेल्या सोनाक्षी सिन्हा आणि बादशाहच्या ‘खानदानी शिफाखाना’ चित्रपटातही काम केले होते. संदीपने ‘कहने को हमसफर’ या ‘ऑल्ट बालाजी’ नाटकातही काम केले होते. मात्र, या सर्व भूमिका वगळून  संदीपला ‘एम.एस. धोनी  मधील सुशांतचा मित्र म्हणूनच अधिक ओळखला जातो.

मृत्यू होण्यापूर्वी संदीपने त्याच्या फेसबुक अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता ज्यामध्ये त्याने एक लांबलचक चिठ्ठी देखील लिहिलेली होती. चिठ्ठीत लिहिले होते की, ‘मला यापुढे जगण्याची इच्छा नाही. आयुष्यात खूप आनंद आणि दुःख पाहिले. प्रत्येक समस्येचा सामना केला, परंतु आज मी मानसिक आघातामधून जात आहे, हे सगळं सहन करण्याच्या पलीकडे आहे. हे मला माहित आहे की आत्महत्या करणे डरपोकपणाचे आहे.

मलाही जगायचे होते, पण शांतता आणि स्वाभिमान नसलेल्या ठिकाणी राहून काय फायदा? या नोटमध्ये संदीपने त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील गुंतागुंतही सांगितल्या आहेत. त्याच्या पत्नीमुळे तो किती नाराज होता हेही अभिनेत्याने सांगितले आहे.

Sandeep-Nahar-who-plays-Sushant-Singh's-friend-in-MS-Dhoni-commits-suicide

 

‘रुही’ चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर जाहीर  


 

 

Social Media