नागपूर : जैश ए मोहम्मद या आतंकवादी संघटनेकडून नागपुरातील RSS मुख्यालय सह काही महत्वाच्या ठिकाणांची पाहणी करण्यात आली आहे . त्यामुळे नागपूर पोलिसांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाची सुरक्षा वाढविण्यात आली असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त RSS च्या मुख्य द्वारासमोर लावण्यात आला आहे .
नागपूर पोलीसांतर्फे सुरक्षा व्यवस्था चोख उभारण्यात आल्याची माहिती नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे . नागपुरातील महत्वाच्या ठिकाणांची जैश ए मोहम्मद च्या स्लीपर सेल च्या दहशतवाद्यांनी केल्याचे सांगण्यात येत असून या ठिकाणांची माहिती पोलिसांकडून जाहीरपणे सांगण्यात आले नाही , मात्र नागपूर पोलीस कोणत्याही परिस्थितीत सज्ज असून यासंदर्भातील तपास गुन्हे शाखेकडे देण्यात आल्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले आहे .
सध्या rss मुख्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारा समोर सिमेंट चे सुरक्षा कठडे क्रेनद्वारे उभारण्यात आले आहेत, या घडामोडीत नागपुरातील महत्वाच्या ठिकाणाच्या चित्रीकरणावर पोलिसांनी पुर्णतः बंदी घातली असून नागपुरातील माध्यमांना तशा सूचनाही वॉटसप च्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत. या महत्वाच्या ठिकाणाचा पोलीस बंदोबस्त 3 दिवसांपासून लावण्यात आला असून काल नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी RSS मुख्यालय येथील सुरक्षेचा आढावा घेतला, वरिष्ठ अधिकारी या सर्व बाबींवर लक्ष ठेऊन असल्याचे दिसत आहेत.