संतूरसम्राट पंडित शिवकुमार शर्मा यांचे निधन

मुंबई : प्रख्यात संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने आज निधन झाले. आपल्या कार्यकीर्दीत त्यांनी संतूर या वाद्याला लोकप्रियते बरोबरच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी प्रतिष्ठा मिळवून दिली.

भारतीय अभिजात संगीतात पंडित शिवकुमार शर्मा यांचं योगदान अतुलनीय आहे. शिवकुमार शर्मा यांना १९९१ मध्ये पद्मश्री तर २००१मध्ये पद्मविभूषण तसंच १९८६ मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. सिलसिला, चांदनी, लम्हे, फासले, या चित्रपटांना “शिव-हरी” नावानं शिवकुमार शर्मा यांनी हरिप्रसाद चौरासिया या जोडीने दिलेले संगीत विशेष गाजलं.

द कॉल ऑफ द व्हॅली या शिवकुमार शर्मा यांच्या संतूर वादनाच्या डिस्क सोबतच, सिलसिला चित्रपटांच्या संगीतालाही प्लॅटीनम डिस्कनं गौरवण्यात आलं होतं .

Social Media