आशियातील पाच तेल खरेदीदारांना सौदी अरेबिया ऑगस्ट करारातील संपूर्ण माल पाठवेल!

सिंगापूर : जगातील सर्वात मोठा कच्चा तेल (crude oil)निर्यातक देश सौदी अरेबियाने म्हटले आहे की, ते आशियातील किमान पाच खरेदीदारांना ऑगस्ट करारातील संपूर्ण माल पाठवतील. घटनेशी थेट संबंधित सुत्रांनी अशी माहिती दिली आहे. तथापि दोन स्त्रोतांनी असेही म्हटले आहे की, सौदी अरेबियाने अतिरिक्त तेल देण्याच्या कमीतकमी दोन खरेदीदारांच्या विनंती नाकारल्या आहेत.
सौदी अरेबियातील सर्वात मोठी तेल कंपनी सौदी अरॅमको ने यासंदर्भात भाष्य करण्यास नकार दिला आहे. गेल्या आठवड्यात, कच्च्या तेल निर्यातीचा सर्वात मोठा समूह ओपेक आणि सहयोगी देश म्हणजेच ओपेक प्लस यांच्यात ऑगस्टपासून तेल उत्पादन वाढविण्याच्या मुद्द्यावर एकमत होऊ शकले नाही.

भारताची ग्राहक डिजिटल अर्थव्यवस्था २०३०पर्यंत ८०० अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज – 

या विषयावर चर्चा खंडित झाल्यानंतर सौदी अरेबियाने आशिया ग्राहकांना विकल्या जाणाऱ्या सर्व स्तरावरील तेलाच्या अधिकृत विक्री किंमतीत (ओएसपी) ऑगस्टपासून वाढ केली आहे. ऑगस्टपासून आशिया ग्राहकांसाठी त्याच्या अरब लाईट क्रूडची किंमत २,७० डॉलर प्रति बॅरल असेल.

घरगुती गॅसच्या नवीन किंमती 1 ऑक्टोबरला होणार निश्चित, 60 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता : ओएनजीसी – 

दुसरीकडे तेल विपणन कंपन्यांनी मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये कोणताच बदल केला नाही. सर्व महानगरांमध्ये पेट्रोलचे दर आता प्रतिलिटर 100 रुपयांच्या पुढे गेले आहेत. पेट्रोल-डिझेल च्या किंमती रोज सकाळी ६ वाजता जारी केल्या जातात. त्यांच्या किंमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर खर्च जोडल्यानंतर ते जवळजवळ दुप्पट होते.
Saudi Arabia to send entire consignment to five Asian oil buyers in August.


BPCLच्या खासगीकरणानंतर ८.४ कोटी ग्राहकांना एलपीजी सिलिंडर मिळणे होणार कठीण! –

बीपीसीएलच्या खासगीकरणानंतर ८.४ कोटी ग्राहकांना एलपीजी सिलिंडर मिळणे होणार कठीण!

किरकोळ आणि घाऊक व्यापाऱ्यांना मिळाला ‘एमएसएमई’चा दर्जा; या बदलामुळे व्यापाऱ्यांना २.५ कोटी रूपयांचा फायदा…. –

किरकोळ आणि घाऊक व्यापाऱ्यांना मिळाला ‘एमएसएमई’चा दर्जा; आता प्राधान्य तत्त्वावर बँकांकडून स्वस्त कर्जे घेण्यास सक्षम!

Social Media