SBI, PNB, HDFC, ICICI बँकांच्या ग्राहकांसाठी आरबीआयची मोठी घोषणा….

मुंबई : बँकेच्या एटीएममधून निश्चित केलेल्या विनामुल्य मर्यादेपेक्षा अधिक वेळा पैसे काढल्यास पुढील वर्षापासून अधिक शुल्क द्यावे लागणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) गुरूवारी बँकांना पुढील वर्षापासून एटीएमद्वारे निश्चित केलेल्या विनामुल्य मासिक मर्यादेपेक्षा अधिक वेळा रक्कम काढणे किंवा इतर व्यवहार करण्याबाबत शुल्क वाढविण्याची परवानगी दिली आहे. त्याअंतर्गत बँकेचे ग्राहक १ जानेवारी २०२१ पासून जर विनामुल्य रक्कम किंवा इतर सुविधांच्या निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा अधिक वेळा व्यवहार करत असतील, तर त्यांना प्रति व्यवहारामागे २१ रूपये द्यावे लागतील जे सध्या २० रूपये आहे.

भरपाई आणि इतर खर्चामध्ये होणारी वाढ

Increase in compensation and other expenses

आरबीआय ने एका परिपत्रकात म्हटले आहे की, ‘बँकांना, इतर बँकांच्या एटीएम मध्ये कार्डच्या वापरासाठी लागणाऱ्या शुल्काची (कार्डचा आदलाबदल शुल्क, इंटरचेंज फी ) भरपाई आणि इतर खर्चामध्ये होणारी वाढ लक्षात घेता त्यांना प्रत्येक व्यवहारासाठी ग्राहकांच्या शुल्कामध्ये २१ रुपये वाढविण्याची परवानगी दिली आहे. वाढीव शुल्क १ जानेवारी २०२२पासून आकारले जाईल. ’

बँकेच्या एटीएममधून दरमहा पाचवेळा विनामुल्य व्यवहार

Free transactions five times per month from bank ATMs

तथापि, ग्राहक पूर्वीप्रमाणेच त्यांच्या बँकेच्या एटीएममधून दरमहा पाचवेळा विनामुल्य व्यवहार करण्यास पात्र असतील. ते महानगरांमध्ये इतर बँकांच्या एटीएममधून तीनदा आणि छोट्या शहरांमध्ये पाचवेळा विनामूल्य व्यवहार करू शकतात. परिपत्रानुसार, १ ऑगस्ट २०२१ पासून प्रति आर्थिक व्यवहारांमधील ‘इंटरचेंज फी’ १५ रुपयांवरून १७ रुपयांपर्यंत वाढविण्याची तसेच गैर-आर्थिक व्यवहाराच्या बाबतीत ५ रूपयांवरून ६ रूपये करण्याची मुभा देण्यात आली आहे.
बँक आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी एटीएम स्थापित करते. याशिवाय इतर बँकांच्या ग्राहकांसाठी देखील याद्वारे सेवा दिली जाते. आरबीआयने सांगितले की, एटीएम स्थापित करण्याचा खर्च आणि एटीएम चालकांच्या देखरेखीच्या खर्चात झालेली वाढ पाहता शुल्क वाढविण्याची परवानगी दिली आहे. यामध्ये संबंधित युनिट्स आणि ग्राहकांच्या सुविधांमध्ये संतुलन साधण्याची गरज या सगळ्याची काळजी घेण्यात आली आहे.
If you withdraw money more than the fixed free limit from ATMs of banks, you will have to pay more charges from next year.


कोरोनामुळे विमान क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान –

कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे विमान क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान; एअरएशियाची ९० टक्के विमाने ठप्प!

बँक ऑफ इंडियावर ४ कोटी, तर पंजाब नॅशनल बँकेवर दोन कोटी रूपयांचा दंड –

आरबीआयने पंजाब आणि बँक ऑफ इंडियावर सहा कोटी रुपयांचा दंड ठोठावला….

Social Media